नवीन लेखन...

कल आज और कल

हा जरा वेगळा विषय आहे. नुकताच मी बालक पालक हा चित्रपट बघितला खूप छान वाटलं , जुन्या आठवणी जाग्या झाल्या, त्यावेळी इतके सगळे बिनधास्त नव्हते. पण एक जगण्यात मजा होती. त्यात एक सीन आहे मुले चोरून निळे चित्रपट बघतात ते , अगदी व्ही सी आर चोरून घरे आणण्याची प्रक्रिया ते ती फिल्म बघणे याचे चितगरीकारां इतके कल्पक आणि सूचक होते.आता तो काळ गेला. सहज काही निळे चित्रपट बघण्यात आले आणि धक्का बसला खरेच आपण किती ‘ प्रगती ‘ केली आहे ते बघून. एका बटणाच्या क्लीकवर सगळे मिळते ही सोय म्हणा किंवा प्रक्रिया म्हणा किती वेगळी आहे.अर्थात बटन तुमच्या हातात असते तुम्ही ठरवायाचे असते.

हल्ली जवळ जवळ खूपच कमी जण टीव्ही चॅनेलच्या बातम्या बघतात कारण त्यातलय विश्वासाला तडा निश्चित गेला आहे. माणसाकडे जसजसा पैसा येत जातो तसतसा तो बेफिकीर होतो हा नियमच आहे. परंतु पूर्वीही असे होते पण उघड होत नव्हते आता उघड आहे उद्या काय असेल ते माहित नाही. मला आज फार महत्वाचा वाटतो कारण आजच्या “पायावर” उद्या उभा आहे हे कोणीही नाकारणार नाही.मग एखादी गोष्ट चांगली का वाईट हे ठरवण्याचा अधिकार पप्रत्येकाला आहे परंतु ती गोष्ट विघातक नसावी अर्थात समाजाच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने.

ह्या लॉकडाऊन च्या काळात सी आय डी आणि क्राईम पेट्रोल सारख्या मालिकांचे अनेक एपिसोड बघितले गेले. त्यातून समाजाचे , वृत्तीचे बरेच चित्र स्पष्ट झाले.सहज पैसे , सहज एखादा गुन्हा करावयाचा आणि तो दबवण्याचा प्रयत्न करावयाचा. त्यादिवशी रस्तात एका माणसाला विदाउट लायसन पोलिसाने पकडलं लगेच त्या माणसाने त्याच्या सो कॉल्ड गल्लीतल्या साहेबाला फोन लावला तो पोलीस खमका निघाला त्याने पावती फाडलीच. असे सो कॉल्ड गावठी , गल्लीतले साहेबच स्वतःला राजे म्हणतात तेव्हा हसू येते. ह्या कोरोनाच्या काळात असेही साहेब लोक कोरोनाचे शिकार झाले तेव्हा खरे भय आणि स्वतःची किंमत त्यांना कळली. परंतु असेही निगरगट्ट आहेत की त्यांना त्याची किमंत कळली नाही. त्यांची मग्रूरी , अहंकार समाज हल्ली बघतच आहे.मग्रुरी , खोटेपणा जास्त काळ टिकत नाही आज दुर्दैवाने वयाच्या साठ वर्षांनंतरही माणसाला खोटेपणा करत आहोत हे कळत नाही म्हणजे एक तर तो अज्ञानी किंवा निर्लज्जच म्हणावा लागेल.

खोटेपणा , मग्रूर , अहंकार याला काळाच्या मर्यादा आहेतच .माणूस तीन फेस मधून जातो वृत्ती , प्रवृत्ती आणि विकृती. जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या स्वभावाच्या हेकेखोर वृत्तीचे समर्थन करतो तेव्हा त्याचा प्रवास वैचारीक विकृतीकडे जात असतो म्हणजे तो झपाट्याने शेवटाकडे जात असतो. प्रत्येकाला शेवट हा असतोच असतो पण तो झपाट्याने विकृतपणे नसावा. अर्थात ज्याच्या त्याच्या असलेल्या आणि नसलेल्या बुद्धिमतेवर अवलंबून असते. नसलेली बुद्धिमत्ता ही कधीही उघडी पडतेच पडते.आपण सुरवात नील चित्रपटापासून केली आणि शेवटी विकृतीपर्यंत पोहचलो , विकृती म्हणजे सतत स्वतःचा अहंकार जोपासणे , दुसऱ्यावर लादणे हीपण विकृतीच असते , सगळ्याच सुज्ञ लोकांना हे समजतेच असे नाही. तर आजमध्ये उद्या लपलेला आहे. हे लक्षात ठेवा .

सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..