काल-परवाची गोष्ट
एक जुना ओळखीचा माणूस भेटला
बरोबर त्याची बायको
तसे तिला कधीच पहिले नाही
एकदम हातात हात घेऊन म्हणाली
बरेच दिवसांनीभेटलात…
तिचा नवरा तसाच उभा..
मी काहीच बोललो नाही
परंतु तिच्या हाताचा स्पर्श
बरेच काही सागून गेला
मी कसा तरी हात सोडवला
त्याच्याशी जरा बोललो
परत तिने शेक hand केला
आयला मी हबकलोच
घरी या म्हणाली
मी तसाच निघालो
असे अनुभव हल्ली
बर्याच वेळा येतात
आणि मनात येत
ती आणि तो
ही नाती आता अशी-कशी
फक्त शरीराची झाली….
कदाचित त्यांना
एकाच अतृप्ततेची
जाणीव-उणीव
झालीअसावी…..
— सतीश चाफेकर.
Leave a Reply