नवीन लेखन...

कलाकाराची सल

इतरांच्या भाषेत अगदी फुटकळ . अहो म्हणजे चेहऱ्याला रंग लावून oh सॉरी (फासून) त्या आयताकृती अहो म्हणजे अगदी २०*३० च्या आयतावर वाकडे तिकडे हावभाव करून , हातपाय झाडत त्या खाली बसलेल्या रिकामटेकडया लोकांना हसवणं किंवा रडवणं. आहे काय त्यात? हे सहज कोणीही करू शकतं. आणि एवढी घसेफोडी करुन , मरमर करुन आणि काय त्या तालमी करुन मानधन ओह पुन्हा एकदा साॕरी पैसे किती मिळतात? फक्त येण्या जाण्या पुरते! ते पण मिळाले तर ठीक नाहीतर आहेच ठणठण गोपाळ! अशाने काय जीवन जगता येणार आहे? आज हरघडीला पैसा मोजायला लागतो . घराबाहेर पाऊल टाकलं रे टाकलं की झालीच पैसे लागायची सुरुवात ! आणि अशात जर वरची परिस्थिती असेल तर मग उजेडच उजेड !अशाश्वत हो सगळं अशाश्वत !

इति सर्वसामान्य माणसं.

आम्ही तुमचं ऐकून घेतलं आता तुम्ही आमचं ऐकून घ्या . अहो! जरा आमचाही विचार करा! नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला! तुम्ही बोलता तितकं सोपं नाही ते! अहो तपश्चर्या करावी लागते . तेव्हा कुठे जाऊन आमची रंगदेवता आणि तुमच्या भाषेतले रिकामटेकडे आणि आमच्या भाषेतले मायबाप रसिक प्रेक्षक प्रसन्न होतात. तुमच्यासारख्या नोकरदार गुलामांना जेवढा समाजात मान असेल त्याहून कैक पटीने जास्त आम्हां कलाकारांचा मानमरातब असतो. तुमच्यासाठी कधी कोणी आलं आहे का पडद्यामागे? अहो तुम्हांला खर्डेघाशी करुन मिळालेल्या पगार वाढीचा आनंद कोणाला होत नाही, तर तुम्हांला भेटून त्यांनी तो आनंद साजरा करणं तर दुरच! कधी संपूर्ण प्रेक्षागृहाने तुमच्यासाठी , तुमचं कौतुक करण्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या आहेत का? नाही ना? पण हे भाग्य आम्हां कलाकारांच्या माथी लिहीलेलं असतं. अरे तुम्हांला काय माहिती नाटक सुरु होण्यापूर्वीची कलाकारांच्या छातीतली धडधड? नाटक सुरु होण्यापूर्वीची रंगदेवतेच्या पूजेतली मजा? जेव्हा संपूर्ण रंगमंच धुपाच्या धुराने पवित्र होतो त्यावेळी आम्हां कलाकारांसाठी तो एक स्वर्गच असतो . हरएक कलाकार त्या स्वर्गात पाऊल टाकण्यासाठी उत्सुक असतो. तिसरी घंटा झाली रे झाली की सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक हास्य उमटतं आणि पुढे जे काही होतं ती म्हणजे निव्वळ जादू! पुढचे अडीच तास कसे निघून जातात ते प्रेक्षकांना कळतही नाही.

म्हणून सरतेशेवटी एकच बोलू इच्छितो की , जोपर्यंत ह्या गुळाची चव कळत नाही तोपर्यंत नावं ठेवण्याचा गाढवपणा करु नका. आम्हां कलाकारांचा शेवटच्या श्वासापर्यंत एकच छंद

चेहऱ्यावर रंग लावून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू असेल तर आसू आणि आसू असतील तर हसू आणणे.

— आदित्य संभूस.

(अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..