कळेल का तुला
माझी ही कथा,
वेळ नसेल तरी
तू समजून घे तेव्हा…
कळेल का तुला
माझी धडपड,
दूर असेल मी
तरी नजर तुझ्यावर…
कळेल का तुला
माझे निःशब्द प्रेम
असेल हळवे अबोल ते
दूर तू जातांना मन बैचेन..
कळेल का तुला
मला ही हवे असते
अबोल प्रेम तुझे ते
समजून घे तू माझे मन ते..
कळेल का तुला माझे
अबोल प्रेम तुझ्यावरचे,
आयुष्यात तू अलवार येते
हृदयात तू अबोल हलकेच..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply