कळेना कसे जडले रे मन
आज हरपले माझे रे भान।।धृ।।
फुलात दिसतो,मनी हसतो
क्षणात जीव उगाच
फसतो
मन अजुनही आहे रे सान
आज हरपले माझे रे भान।।१।।
घरात होतसे तुझाच भास
दिलवरा श्वासात तुझी आस
साद ऐकण्या आतुरले कान
आज हरपले माझे रे भान।।२।।
तळमळ वाढे उगाच जीवा
हळहळ दाटे मनात प्रिया
कंठात दाटूनी आले रे प्राण
आज हरपले माझे रे भान।।२।।
— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक