पांघरुनी , बेगडी मुखवटे..
सुन्न जगावे ! सुंदर जगती..
क्षणक्षण सारे आव्हानांचे..
जीवाचे , जगणेच कसरती..।।१।।
कोण भला अन कोण बुरा ?..
जगती , सारीच सुंदोपसुंदी..
विश्वासाचा नाहीच भरवसां..
स्वार्थापोठी ! साऱ्या संगती..।।२।।
नीती , निष्ठा , प्रीती , भक्ती..
टांगलेल्या , आता वेशीवरती..
आज निर्लज्यांची सदैव सद्दी..
स्वाहा:कार ! विध्वंसी नीती..।।३।।
कलियुगाचीच , सारी किमया..
रामराज्याविना , राज्य राक्षसी..
हत्त्या ! मानवतेची ही निर्घृणी..
विनाशी ! हीच आज संस्कृती..।।४।।
विवेकानेच , आज इथे जगावे..
स्वस्वार्था कां उगा कवटाळावे..
तन रेतीच आहे , मृत्यूच सत्य..
रिकाम्याच रे या ओंजळी अंती..।।५।।
वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ६७
१९ – ५ – २०२१
Leave a Reply