माज्या कुकवाचा धनी, माज्या डोरल्याचा मनी
कवातरि ऐक माज्या काळजातली गानी
भिताडानाबी कळतंय रोजचं माज दुकनं
तूला का कळू न्हाय, माज झिजून झिजून ह्ये जिणं
संगटीने ऱ्हातुयस येकाच खोपीमंदी
संगटीने पितुयस येकाच खापरातलं पानी
तरी बी ऱ्हातुया कोरडंच वाळवंटावानी
दावू कसं रं तूला, माज्या पिरितीतली ज्वानी
खोपट्यातल्या गर्दीत हुडकू सांग कसं
माज्या काळजातलं इप्सित सांगू तुला कसं
खटल्यातनं मान मोडू मोडू जाय
बायांच्या हाताबुडी राबून जीव उगी ऱ्हाय
त्येबी नगं चल, घ्ये काळजाचा तरी ठाव
त्यावर गुजरलं जिंदगी, येकवार तरी शबूद ओला दाव
कटाळून जातो जीव, उठतो वणवा ह्यो मग बंडाचा
रोखतो उंबरा, देतो आन, गळातल्या फुटक्या डोरल्याचा
असंच हाय आता ह्ये वाळकं माज पान
कंदी येकवार बग घरातल्या घरणीकडं, तूला माजी हाय आन!!
— वर्षा कदम.
Leave a Reply