भगवान विष्णूंचा दहावा अवतार. काहींचे मते तो होऊन गेला तर पुराणांच्या मते तो होणार आहे. कल्की पुराणात कलीयुगाचे शेवटी हा अवतार होईल असे सांगितले आहे. त्याचे आयुष्य २५ वर्षे असेल. तो देवदत्त नावाच्या घोड्यावर बसून पृथ्वी पादाक्रांत करेल, दुष्ट व अधर्मी लोकांचे दमन करील व परत धर्मस्थापना करेल. सर्वात शेवटी गंगा-यमुनांच्या संगमात देह विसर्जन करील. कल्की पुराणाप्रमाणे विष्णु, भागवत, महाभारत वगैरमध्ये अशाच आशयाचे उल्लेख आहेत. याच्या मूर्तीबद्दल वर्णन करताना हेमाद्रीने दोन हाताचा खङगधारी, रागावलेला, घोड्यावर बसलेला, महाबली, आणि दुष्ट- अधर्मी यांचा उच्छेद करणारा.
काही ठिकाणी चार हातांचे सुद्धा वर्णन आढळते.
-श्री करंदीकर गुरुजी
Leave a Reply