जगी भेटली माणसे
अनभिज्ञ ती सारी…
जोडली नाती
निराशाच पदरी…
नव्हता जिव्हाळा
भावशून्य सारी…
नाही कुणी कुणाचे
छळे सत्य जिव्हारी…
जखमांचे झिरपणे
नि:शब्द वाहते अंतरी…
असले कसले जगणे
प्रीत उदास हृदयांतरी…
हा कल्लोळ असह्य
भावनांचे रुदन भीतरी…
रचना क्र ७०
१०/७/२०२३
वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
Leave a Reply