कल्पॊपसंहृतिषु कल्पितताण्डवस्य
दॆवस्य खण्डपरशॊः परभैरवस्य ।
पाशाङ्कुशैक्षवशरासनपुष्पबाणा
सा साक्षिणी विजयतॆ तव मूर्तिरॆका ॥ १३ ॥
आई जगदंबेच्या परांबा, परमेश्वरी स्वरूपाला भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे एका वेगळ्याच पद्धतीने सादर करीत आहेत.
सत्व ,रज आणि तम या तीन गुणांच्या तीन देवता म्हणजे अनुक्रमे भगवान विष्णु, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शंकर.
यापैकी भगवान शंकरांचे कार्य म्हणजे विश्वाचा विलय. ज्यावेळी भगवान हे कार्य करतात त्यावेळी ते रुद्रतांडव नृत्य करतात. त्यामध्ये सर्व चराचर सृष्टीचा विनाश होतो. या भीषण तांडवनृत्याचे अधिष्ठान वापरून आचार्य श्री आई जगदंबेचे वर्णन करतात.
त्यासाठी आरंभी या नृत्याचे वर्णन करताना ते म्हणतात,
कल्पॊपसंहृतिषु- कल्पाच्या शेवटी केल्या जाणाऱ्या उपसंहार नृत्याच्या वेळी, कल्पितताण्डवस्य- तसे घडावे अशी कल्पना करून केलेल्या तांडवनृत्य समयी,
दॆवस्य खण्डपरशॊः परभैरवस्य- पर भैरव अर्थात भगवान महादेवाचा परशु खंड खंड विखंड झाला असताना.
हा संहार इतका भयानक आहे की त्यात भगवान शंकरांच्या हातातील परशु देखील खंडित होतो. यातून त्याची तीव्रता लक्षात यावी.
आचार्यश्री म्हणतात हे आई जगदंबे,
पाश,अंङ्कुश,
ऐक्षवशरासन- इक्षु म्हणजे ऊस. त्यापासून बनविलेले ते ऐक्षव. शर म्हणजे बाण त्याचे आसन म्हणजे धनुष्य.
पुष्पबाणा- फुलांचे बाण.
अशा आयुधांनी सुशोभित असणारी,
सा साक्षिणी विजयतॆ तव मूर्तिरॆका- तुझी एकच मूर्ती, अर्थात तू एकटीच या सर्व गोष्टींची साक्षीदार असतेस. त्यात तुझा विजय असो.
भगवान शंकराचा विश्वविलयलीलेची साक्षी असते आई जगदंबा.
ज्यावेळी काही शिल्लक राहत नाही आणि अन्य कोणीच नसते, त्यावेळी जगदंबे ‘असणे’ तिचे खरे वैभव आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply