कळ्यांचे दुःख फुलांना न कळले
रविकिरणांचे दाह धरणीला न कळले
नदीचे संथ वाहणे सागराला न कळले
गरजणाऱ्या ढगांचे दुःख सरींना न कळले
तिच्या जणीवांचे पड त्याला न कळले
त्याच्या मनाचे गुज तिला न कळले
मनातले भाव हृदयला न कळले
अंतरीचे दुःख मनाला न कळले
त्याच्या भावनांचे कोडे तिला न कळले
तिच्या मनाचे बंध त्याला न कळले
निःशब्द पाकळ्यांचे गुज वेलींना न कळले
भाव गुलाबाचे काट्याना न कळले
त्याचे शब्द मंतरलेले तिला न कळले
तिच्या अस्वस्थ क्षणांचे काहूर त्याला न कळले
सुन्या मैफलीत स्वरांचे बोल वाद्यांना न कळले
आकाशी चांदण्यांचे सूर चंद्राला न कळले
तिचे भाव व्याकुळ त्याला न कळले
निष्पर्ण पानांचे दुःख फांदीला न कळले
तिच्या मिठीचे भाव त्याला न कळले
त्याच्या अव्यक्त भावनांचे बंध तिला न कळले
दुःख इथे प्रत्येकाला सल न कुणाला कळले
मोगऱ्याचे धुंद होणे कळ्यांना न कळले
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply