हसत जगावे हसत मरावे.
क्षणक्षण, धुंद मुक्त जगावे
स्वसुखातची रमता रमता
अंतरात विवेका जागवावे….
मी जे वागतो, तेच बरोबर
असे भ्रामक निष्कर्ष नसावे
जीवात्म्याला त्या मन असते
कां? उगा कुणाला दुखवावे….
अंती हिशेबात तोलणाऱ्या
चित्रगुप्ताला सदैव स्मरावे
संचित सत्कर्माचे, चिरंजीव
मनांधाराला, उजळीत रहावे….
माणसा, माणसात देव पहावा
कल्याणकारी अदृष्या जाणावे
अस्तित्व, श्वासांचेही बेभरोसी
मनामनाला नित्य जपत रहावे
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २६१
१५/१०/२०२२
Leave a Reply