काळ्याशार तमांमध्ये,
पाणीही बनते कुट्ट काळे,
रंग खेळती मजेत तिथे,
पंचमीची क्रीडा चाले,–
पिवळसर, सोनेरी, हिरवटसे,
विचरती पाण्यात रांगेने,
बिंदू सारे प्रतिबिंबित कसे,
पाहती डोकावून,उत्कंठेने,–!!!
वाकून खाली सगळे जरासे,—
प्रतिमा आपुलीच न्याहळत,
घेती धडे एकरुपतेचे,–,
पुढे पुढे सरकत,सरकत,
एक दुसऱ्यात असा मिसळे,
एकत्रीकरण जणू कंगोऱ्यांचे,–!!!
विविधरंगी त्यांची दुनिया,
मूळ रंग मात्र एकच असे, विविधतेतून एकता ना,
सर्वकाळी त्यांच्यात दिसे,–!!!
मोहक सुंदर जे अतुलनीय,
बघणारा पाहत राहे, —
सौंदर्याची दिसता,खाण
निसर्ग अशीच लयलूट करे,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply