मौन पांघरुनी चोरपाऊली
यामिनी, चांणदे पेरीत येते
नि:शब्दी, अव्यक्त भावनां
अलवार मिठीत घट्ट मिटते
दाटता काळोख नभांगणी
घरट्यातुनी विसावतो जीव
प्रतिक्षा! मौनात प्रभातीची
चाहूल, सोनपाऊली सजते
प्रसन्न! उषा किरण कांचनी
जगण्यासाठी देते आत्मबल
तेजाची ही कोवळी किमया
चैतन्याला, उधळीत उजळते
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ५३.
१९ – २ – २०२२.
Leave a Reply