नवीन लेखन...

कंगोरा घाटी राष्ट्रीय उद्यान (उगवता छत्तीसगड – Part 5)

कंगोरा घाटी राष्ट्रीय उद्यान (Kanger valley national park) हे राष्ट्रीय उद्यान जगदलपुर पासून ३४ किमी वर  कांगेर नदी भोवतालच्या डोंगर रांगात पसरलेले आहे. जंगलाचा विस्तार २०० स्क्वे.कि.मीअसून भारतातील एक महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. आत फिरण्यास उघड्या मारुती जिप्सीची सोय आहे(४ जणाना अंदाजे १५०० रु. तासाला). ह्या राष्ट्रीय उद्यानात खडबडीत लाल मातीच्या रस्त्यांचे जाळे पसरले आहे. संपूर्ण कंगोरा घाटी राष्ट्रीय उद्यान घनदाट जंगल आहे. कंगोरा घाटी राष्ट्रीय उद्यानात फिरताना मधेच पक्षांचे आवाज ऐकू येतात. उद्यानात साल, टीक व बांबू या झाडांची बने पसरलेली आहेत. कुठेही जंगलतोड नसल्याने हे जंगल घनदाट वाढलेले आहे. ह्या उद्यानात भन्नाट शांतता(सन्नाटा) अनुभवास येते. बस्तर मैना ( जंगली मैना ) हा छत्तीसगड राज्याचा राज्य पक्षी या जंगलात भरपूर आढळतो.  बस्तर मैना हुबेहूब माणसा सारखा आवाज काढतो.ह्याचा रंग चकचकीत काळा असून त्यास उठून दिसणारे पिवळे पाय, पिवळसर तांबूस चोच आहे. त्याच्या पंखांच्या कडेला पांढरी किनार असते. थंडीत स्थलांतरीत पक्षांची कंगोरा घाटी राष्ट्रीय उद्यान ही हमखास जागा आहे. ह्या राष्ट्रीय उद्यानात हरणे सांबर, बायसन, कोल्हे व तुरळक बिबटे आहेत पण प्राणी दिसण्याची शक्यता कमी असते. कंगोरा घाटी राष्ट्रीय उद्यानातील जंगल सफारी मनाला भावणारी आहे.

जंगलातील एक रस्ता कोटमसार गुहे कडे जातो. या गुहा हे एक नैसर्गिक गूढ आहे. १९०० सालात ह्या गूढ गुहेचा प्रथम शोध लागल्याची नोंद आहे. ह्या गुहेच्या अंतर्भागातील माहितीची नोंद कुठेही नसल्याने  ही गुहा अज्ञानातच राहिली. १९५१ साली निसर्ग संशोधक डॉ.शंकर तिवारी यांनी ह्या गूढ गुहेच्या खाली उतरून त्याचा सखोल अभ्यास केला. ही गुहा जमिनीखाली ३०० मीटर असून तळाला रुंदी २० ते ७२ मीटर इतकी विशाल आहे. तेथ पर्यंत जाण्यास प्रथम मोठाल्या पायऱ्या असून पण नंतर कसरत करतच खाली उतरावे लागते. सर्व बाजूनी अणकुचीदार कातळ असल्याने मार्ग अतिशय निमुळता होत जातो. सर्व बाजूनी आत स्टॅलॅगमाइट आणि स्टेलेक्टाइट निर्मिती आहे.(stalagmite, and stalactite formation) छतावरून खाली लोंबणारे आणि जमिनीवरून वर झेपावत जाणारे ओबड धोबड विविध क्षार,दगड, माती मिश्रीत खांब यांच्या मधून आपण खाली उतरतो.तळाला सपाट भूभागावर याच मिश्रणाने तयार झालेले रेखीव शिवलिंग तयार झालेले असून ते सतत वाहणाऱ्या पाण्यात असते.त्या मधील पोहणारे मासे जन्मता अंध असतात.  आत प्रचंड काळोख असून गाईड बरोबर सौर उर्जेवर चालणाऱ्याबॅटऱ्या असतात.तळाला हवा विरळ असल्याने गुदमरल्यासारखे होते.

कंगोरा घाटी राष्ट्रीय उद्यानाचा सर्व प्रदेशच गुहांचा आहे.ह्यातील एक गुहा म्हणजे कैलास गुहा. कैलास गुहा २०० मीटर खोल आणि ३५ ते ५० मीटर रुंद असून आत तयार झालेले खांब दिव्यांच्या झुंबरा सारखे दिसतात. आत पसरलेले खडक कैलासपर्वता सारखे वाटतात म्हणून ह्या गुहेला कैलास गुहा असे नांव आहे. ह्या गुहेच्या तळाला गेल्यावर एक भन्नाट आवाज ऐकण्यास मिळतो( musical point.) दगड आणि लाइमस्टोन एकमेकावर आपटल्याने हा ध्वनी उत्पन्न होतो.कंगोरा घाटी राष्ट्रीय उद्यानातील दंडक गुहा मधील लाइम स्टोन मुळे कोरीव शिल्पे तयार झालेली आहेत.

या जंगल दऱ्या-खोऱ्याच्या प्रदेशात अनेक धबधबे आहेत. त्यातील एक म्हणजे कांगेर धबधबा. कांगेर नदीचा प्रवाह एका खोल दरीत अजस्त्र दगडांच्या मधील भेगामधून पडत असल्याने हा धबधबा तयार झाला आहे. ह्या धबधब्याच्या बाजूनी घनदाट जंगलामुळे निसर्गाचे एक रौद्र स्वरूप अनुभवता येते.तळापर्यंत आपणास जाणे अशक्य पण एक शेळ्यांचा कळप तुरुतुरू पाणी पिण्यासाठी उतरला होता.पसरलेल्या दगडांच्या उंचवट्यावर आरामात बसून हा अनोखा निसर्ग शांतीचा अनुभव घेण्याची लज्जत काही औरच होती.

तीरथगड धबधबा:

जगदलपुर पासून ३९ किमी अंतरावर असलेला हा धबधबा कांगेर पार्क जाणाऱ्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस आहे. हायवे पासून थेट धबधब्या पर्यंत जाणारा रस्ता सुरेख घनदाट जंगलातून जातो.५० एक पायऱ्या उतरल्यावर डोंगर कपारीतून कोसळणाऱ्या धबधब्याचे विहंगम दृश्य जंगलाच्या पार्श्वभूमीवर पाहताना डोळ्याचे पारणे फिटते.तळा पर्यंत जाण्यास २५० पायऱ्या असून काठावर जुने शिव मंदीर असून प्रवाशांची झुंबड पायऱ्या वर दिसत असते.

— डॉ. अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..