कान्हा तू माझाच ना
तुझीच मीरा
मोहन शाम
हृदयातला हीरा
दिनरात भजन
हे राधेशाम
कृष्णभक्तित
लिन हे माझे नाम
मी भक्त गिरिधारी
तद्रुप झाली
मी नाही दुजी
तुझ्या मंदीरी आली
देता विषाचा प्याला
अमृत भासे
त्यातही तुच
हेच मनात ठासे
रिचवला मी प्याला
तुच दिसला
माझाच तुरे
प्राण तुला दिधला
प्राण तुला दिधला
— सौ. माणिक (रुबी)
नाशिक
Leave a Reply