नवीन लेखन...

करमणुकीचे जंजाळ

१९९०च्या दशकात ‘ग्लोबलायझेशन’चे वारे भारतात वाहू लागले आणि त्याचे बरे-वाईट परिणाम लगेचच विविध क्षेत्रांवर दिसू लागले.  सिनेमा बदलला, अभिनयशैली बदलली, तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाले, संगीताचे पाश्चात्यीकरण झाले, स्पेशल इफेक्ट्सनी सिनेमाचा पडदा व्यापला; एवढेच नव्हे, तर चित्रपटगृहेदेखील बदलली, चित्रपट चालविण्याची-प्रक्षेपणाची तंत्रे बदलली आणि कोरोनाच्या काळात जबरदस्त तडाखा बसलेल्या मनोरंजन उद्योगात ‘ओटीटी’चे आगमन झाले. ही सगळी स्थित्यंतरे गेल्या ३०-३२ वर्षांची.

दर्जेदार चित्रपट निर्मिती  गेली १०० वर्षांपेक्षा जास्त काळ भारतभर आपण अनुभवत आहोत. २१व्या शतकाची दोन दशके आपण पार केली आहेत. या कालखंडात आमूलाग्र माध्यमक्रांती झालेली आपण बघतो.

दृक्-श्राव्य माध्यम हे निर्विवादपणे या शतकाचे अस्त्र आहे. सिनेमा निर्मितीचे-प्रदर्शनाचे तंत्र बदलले, शेकडो वाहिन्यांमधून स्वस्त आणि सवंग करमणुकीचा भडिमार प्रेक्षकांवर घरबसल्या झाला, दिग्दर्शनाचा बाज बदलत गेला, संगीताचा साज बदलत गेला, एवढेच काय अभिनयाची शैलीदेखील बदलली आणि यातच भर म्हणजे ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मचे आक्रमण आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. मेंदू सुन्न करणाऱ्या या वास्तव परिस्थितीत दर्जेदार अभिरुचीसंपन्न प्रेक्षकांना यापुढे कसला आधार असणार आहे? करमणुकीच्या या जंजाळात ‘चांगले’ काय? आणि ‘वाईट’ काय? हे रसास्वादासह समजावून सांगण्याची जबाबदारी कोण पार पाडणार आहेत?

संकलन : विनोद सुर्वे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..