नवीन लेखन...

कारण येथे सर्वांना जिंकायचे आहे

जन्माला आलेल्या बाळाला दिले जाते इंजेक्शन जातीचं……. तर कधी म्हट्ले जाते हा मुलगा वंशाचा दिवा, तरी मुलगी परक्याचे धन……. मग कधी त्या बाळाच्या वर्णनावरून ही केल्या जात गोष्टी आणि सुरू होतो भेदभाव काळ्या- गोरेपणाचा……. माणूस म्हणून जन्म तर घेतो आपण पण गुंतल्या जातो येथील सामाजिक व्यवस्थेमध्ये…….. कधीकधी खूप प्रेमळ आपुलकीचा वाटतो हा समाज, पण कधी कधी त्यातीलच काही गोष्टी मनाला न समजणार्या आरपार करून जातात. काही प्रथा, काही रूढी- परंपरा नकोशा का बर वाटतात……..? आपल्यास माणसावर आपल्या समाजावर आपले नकारात्मक प्रश्न उठतात…. मुद्दे सर्वांची सारखीच असतात. पण बोलत मात्र कोणीच नाही. आपल्या भावनाला कोंडून गुदमरून जगतोय का आजचा माणूस…….? शाळेला जाणारा पोर परीक्षार्थी आहे की विद्यार्थी आहे, सुजान नागरिक बनवण्या ऐवजी त्याला स्पर्धक बनवून टाकलाय का पालकांनी…..? मुखवट्याचे आयुष्य जगणं चाललय सगळ्यांचे, स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतोय आपण असं वाटतंय आता. सुखाचा झरा शोधता-शोधता आपण एकमेकांशी तुलना करत चाललो आहे आणि आपल्या मनाचे समाधान मात्र हरवत बसलो आहे.स्पर्धा या शब्दाने जणू आयुष्य व्यापून टाकले माणसाचे. तो जगतो तर आहे पण ते केवळ जिंकण्यासाठी…… जिंकणे स्वाभाविक असते प्रत्येकाला जिंकाव असं वाटतं पण धावता- धावता आयुष्यातील खरेपण आयुष्य काय असतं हे तर आपण विसरत चाललो नाही ना..? याचा विचार मात्र खरंच माणसाने करावा. मनाचे समाधान हरवून आपण भौतिक गोष्टींमधून समाधान शोधतो आहे. एक चांगलं आयुष्य जगणे म्हणजे आपल्या आयुष्यात दुसऱ्याला मदत करणं, गरजूला मदत करणे,, उपाशी असलेल्या व्यक्तीला दोन घास भाकर देणे, आपल्या आयुष्यामध्ये ज्याला आपल्याकडून गरज आहे किंवा आपण ज्याची एखाद्या खरोखर गरजू व्यक्तीच्या कामी येऊ शकतो असे कार्य करणे म्हणजे पण आयुष्यामध्ये आपण समाधान प्राप्त करू शकतो. या स्पर्धेच्या युगामध्ये जिंकण्यासाठी आपण स्वतःला इतकं विसरून गेलो आहे की आपण आपले अस्तित्व निर्माण करतो आहे , पण खरं जगणं विसरलो हे मात्र खरे. ग्रामीण भागातील मुले पुणे मुंबईला जातात, तिथे शिक्षण घेऊन त्यांची मुलं परदेशी जातात आणि इकडे त्यांच्या आई वडिलांची कशी अवस्था आहे ते मात्र कोणी बघत नाहीत. आणि पुण्या-मुंबईतल्या मुलगा ग्रामीण भागामध्ये त्यांचे आई-वडील कसे जगतात हे बघत नाही म्हणजे आपण किती बिझी झालो हे कळते. आई वडील अर्थार्जनासाठी बाहेर पडतात तेव्हा मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, आणि जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा ते आई-वडिलांना वेळ देऊ शकत नाही अस असल्यामुळे आपण जगतो तर एकमेकासाठी पण आपण आपल्या नात्यांना वेळ देत नाही ही मात्र दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल. जन्मापासून सुरू झालेली ही आयुष्याची स्पर्धा एक वेळ थांबणार आहे ,सर्व माणसे सारखीच , सारखीच भावना,रक्त ही सारखेच, मग एकमेकांच्या बद्दल कशाला विरोध आहे कसल्या जातीपाती ,कशाला, भेदभाव, माणसांने फक्त माणूस म्हणून का जगू नये….? येथे बोलले जात वृत्ती मात्र फारच कमी, कारण स्पर्धेच्या या जगामध्ये माणूस स्पर्धक झाला आणि तो इतका बेभान झाला की त्याला कुठल्याही गोष्टीची काही घेणे देणे नाही , त्याला फक्त जिंकायचं आहे आणि ती जिंकणे त्याच्या आयुष्याचं ध्येय होऊन बसलेल आहे.

इथल्या बहुतेक सर्वच स्पर्धेमध्ये माणूस निश्चितच जिंकणार पण खर्या आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तो हरणार तर नाही ना ही भीती मात्र वाटते…..

Avatar
About Adv Vishakha Samadhan Borkar 18 Articles
सामाजिक विषयावर लिखाण,कविता,कादंबरी,ललित लेखन करायला आवडत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..