न राही तुमचे ते कर्म,
ज्यात प्रभू इच्छा अंतीम….१,
प्रत्येक घटनेचे अंग,
त्यात मुख्य ईश्वरी भाग….२
तुमच्या मार्फतच होई
त्याचा इशारा कोण पाही….३,
सर्व समजे मीच केले
अहंकाराने मन भरले….४,
षडरिपू असे साधन
खेळविता यावे म्हणून…५,
राग,लोभ, मोह मायादी
ठेवती वाटते आनंदी….६,
परि याच्याच शक्तीने
प्रभू खेळ चाले युक्तीने….७,
षडरिपू सारे टाळून
मुक्ती मिळेल खेळातून…..८
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply