मानवी जन्म म्हणजे जन्मोजन्मिचे पुण्यप्रदी संचित असते! सतकर्माचे फळ असते असे सर्वश्रुत आहे, त्यातही याच जन्मामध्ये पूर्वकर्माचे भोगही भोगावे लागतात हेही एक सत्य!
या प्रारब्ध भोगातुन कुणाचीही सुटका नसते हे वास्तव आहे. स्वानुभवाने या गोष्टीची शाश्वत अनुभूती येत असते. हिंदू संस्कृती मद्धये सर्व संस्कारांचे महत्व विशद केलेले आहे.आचार! विचार! उच्यार! सहवास! श्रद्धा! भक्ती! निर्मोही प्रिती वात्सल्य! यातूनच उत्तम संस्कार घड़तात.कलियुगात आज पाप! पुण्य! सुख! दुःख!या गोष्टी साशंक, संभ्रमी आहेत! भौतिक सुखाच्या स्वार्थापायी सारे मानवी वर्तन आज अमानवी,संस्कृतीहीन झाले आहे. कुठलीच नाती, अगदी रक्ताची देखील आज सात्विक सुखरूप उरली नाहीत हे वास्तव आज जागोजागी,क्षणोक्षणी पहात आहोत.आजची सामाजिक अराजकता, अस्व:स्थता,असुरक्षितता, नैतिकतेचे अवमूल्यन, विध्वंसक, असुरी बलात्कारी प्रवृत्ती या निचांधतेचे निलाजरे द्योतक (दर्शन) आहे.हेच आजचे नग्न वास्तव आहे..! मानवी पुरुषार्थ नपुंसक झाला आहे.
राजकारण, समाजकारण सर्वारथाने गलिच्छय झाले आहे. बळी तोच कान पीळी हीच प्रवृत्ती पोसली आहे.भगवंताच्या दरबारात देर है! अंधेर नही असे म्हणतात!..समाज पुरुष जागृत होणे अनिवार्य आहे, हाच विचार प्रत्येकाने आवर्जून केला पाहिजे. अन्याया विरुद्ध दंड थोपटले पाहिजेत! आता क्रांती हाच पर्याय उरला आहे हेच खरे!
या जन्माचे पापकर्म हे भोगावेच लागते हा प्राचीन इतिहास आहे. दुष्कृत्याला शासन हे आहेच..!
जन्मोजन्मीच्या संचित कर्माचे भोग भोगण्यासाठीच जींवन चक्र अविरत चालू असते.या विधिलिखित चक्रातुंन जीवात्मा जो पर्यन्त मुक्त होत नाही त्याला मोक्षमुक्ति नसते! ही वास्तवता आहे.
“पुनरपि जननं, पुनरपि मरणं।
पुनरपि जननी,जठरे शयनं।”
या ओविला अनुसरुन अनेक योनी मध्ये जीवात्मा भरकटत असतो.पूर्वकर्मानुसार हा जीवात्मा दूर लोटला जातो अन केलेली कर्मे ही भोगावीच लागतात! हे निर्विवाद. ” जे जे अनिष्ट,अपराधी कर्म तुम्ही कराल त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागतेच.ही जीवनातील वास्तवता आहे..म्हणुनच…. ” हसत हसतची कर्म करावे, भोगावे रडत रडतची.परिणामी असे म्हटले आहे…
शुभ, अशुभ कर्माच्या आधारेच आपले प्रारब्धयोग आपल्या वाटयास येत असतात अन ते भोगुनच संपवावे लागतात. तेव्हा वास्तव जीवनात आपण विवेकाने आपले आचरण शुद्ध सात्विक करावे!
महाभारतामध्ये कौरव पांडवांच्या युद्धामध्ये १०० कौरव मारले गेले असता धृतराष्ट्राने भगवान श्रीकृष्णास ” अरे हे वासुदेवा ” अरे ही एवढी क्रूर दुर्दैवी घटना कशी घडली? अशा कुठल्या अघोर पाप कर्माचा भोग मी भोगतो आहे? असे विचारले असता, भगवंत श्रीकृष्णाने आपल्या योगसामर्थ्याने राजा धृतराष्ट्रास त्याच्या पूर्व जन्मांचे अवलोकन करण्यासाठी दिव्यदृष्टि प्रदान केली. तेंव्हा धृतराष्ट्राला आपल्या पूर्वजन्मात केलेल्या सर्वच पुण्य अन पाप कर्मांचे दर्शन झाले. त्यामध्ये साधारणत: ५० पूर्वजन्मांच्या दरम्यान तो एक सर्वसामान्य पारधी होता, याची त्याला जाणीव झाली.तो एकदा शिकारीला गेला होता तेंव्हा एका मोठ्या वृक्षावर असंख्य पक्षी बसले होते, त्याला शिकारीचा मोह अनावर झाला,अन लालसे पोटी त्याने त्या वृक्षालाच आग लावली.त्या आगी मध्ये काही पक्षी उडून गेले, काही पक्षी त्या आगिच्या धगीमुळे आंधळे झाले, तर काही पक्षांची पिले ही उडू न शकल्यामुळे आगित होरपळून मरण पावली. जन्मोजन्मीच्या संचित पुण्यकर्मामुळे धृतराष्ट्र राजा झाला,त्याला राजेश्वर्य लाभले. शंभर पुत्रही त्याला लाभले, पण पूर्व कर्मानुसार त्याने केलेले पापकर्मही त्याचे समोर उभे राहिले. तो आंधळा झाला आणी त्याचे १०० पुत्रही युद्धात बळी गेले,मृत पावले.
हा वास्तव दृष्टांत विचार करण्याजोगा आहे. केलेल्या कर्माने योग्य वेळ येईपर्यंत त्याचा पाठलाग केला अन अंती कर्माचे फळ समोर उभे राहिले..असे अनेक दृष्टांत पूर्वइतिहासात, धर्मग्रन्थात उपलब्ध आहेत.त्याचा उल्लेखही करता येईल.
निष्कर्ष एकच.….ईश्वराच्या राज्यात देर जरी असला तरी अंधार नाहीच नाही.अन्याय तर नाहीच नाही! सर्वांनाच योग्य वेळी आपल्या “पापपुण्य कर्माचा” हिशेब चुकता करावाच लागतो!
याचाच विचार विवेकाने करुंन आपले कर्म करीत रहावे! सतप्रवृत्तिने, ईश्वरावर निष्ठा ठेवून त्याला मनोभावे शरण जावे! तरच जींवन कृतार्थ होईल.
नमस्कार.
इतिश्री (लेखनसीमा)
— वि.ग.सातपुते. (विगसा)
Leave a Reply