नवीन लेखन...

कर्मयोगी बी. व्ही. परमेश्वर राव

वैज्ञानिक व सामाजिक कार्यकर्ता असे मिश्रण खरे तर फार दुर्मीळच. त्यासाठी जगण्याची वेगळी तत्त्वे अंगीकारावी लागतात. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते बी. व्ही. परमेश्वर राव यांनी अणुशास्त्रज्ञ म्हणून अमेरिकेत ऐषारामात जीवन जगण्याची संधी असताना त्याचा त्याग करून मायदेशाची वाट धरली होती. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९३३ रोजी झाला.

१९६०-७० या काळात अमेरिकेत अणुशास्त्रात पीएचडी केल्यावर त्यांना पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीकडून सहयोगी प्राध्यापक व दोन अमेरिकी कंपन्यांकडून नोकरीचा देकार होता. पण त्यांच्यात एक अवलिया लपलेला होता, त्याने त्यांना पुन्हा दिमली या त्यांच्या मूळ गावी परत आणले. येथे त्यांनी निरक्षर व वंचितांची सेवा सुरू केली. आतला आवाज स्वस्थ बसू देत नसल्यानेच ते मायदेशी आले. दिमलीत परतल्यानंतर त्यांनी १९७६ मध्ये भगवत्तुला चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे बीसीटी ही संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून त्यांनी शाळा सुरू केली.दिमली गावात त्यांनी हायस्कूल बांधले.स्वतःचे पैसे टाकले. आंध्रचे तत्कालीन शिक्षणमंत्री आणि आपले माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी त्याचे उदघाटन केले होते.त्या शाळेची कीर्ती ऐकून राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांनीही शाळेला भेट दिली होती. दोन दशकांत त्यांनी पंचधारला हिल्स भागातील खडकाळ टेकडय़ा हिरव्यागार केल्या. वाकपाडू या भागाला नेहमी भरतीच्या लाटांचा मार बसत होता. तेथे आता कोळंबी उपज केंद्र आहे. मीठनिर्मितीही केली जाते. विशाखापट्टणम येथील ५० खेडय़ांतील लोकांचे प्राक्तन त्यांनी बदलून टाकले. महिलांना आर्थिक साक्षरता प्राप्त करून दिली. त्यामुळे कुटुंबांची स्थितीही सुधारली. साक्षरता, महिला प्रशिक्षण यात त्यांनी किमान हजारभर प्रकल्प राबवले. अथक परिश्रम करुन पंचधारा हिल्स या ओसाड प्रदेशाचा २ दशकात त्यांनी केलेला कायापालट पाहून सरकारी यंत्रणाहीआश्चर्य चकित झाली.वाकपाडा या समुद्रकिनाऱ्यवरील बाधित भागात कोळंबी उपज आणि मीठ निर्मिती केंद्राची निर्मिती, साक्षरता,महिला सबलीकरण,प्राथमिक शिक्षण याक्षेत्रात १ हजाराहून अधिक प्रकल्प राबवून एक छोटी संस्था किती मोठे काम उभारु शकते हे पाहून जागतिक बँक आणि केंद्र सरकारकडूनही या कामांची प्रशंसा झाली.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकदा अचानक त्यांना बोलावून घेतल्याने त्यांची विमानाने जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ते गांधीवादी मूल्यांवर श्रद्धा ठेवून जगले, जे आजच्या काळात फार अवघड. त्यांच्या कामातून ग्रामीण भागातील अनेक तरुणांनाही प्रेरणा मिळाली हे विशेष. ‘जीवनात आपल्यासमोर अनेक कठीण पर्याय असतात. पण माझ्या मते हे पर्याय आपणच आपल्यासाठी अवघड करीत असतो. तुम्ही एकदा जीवनाची दिशा ठरवलीत, तर त्यामागे तुमची दृष्टी व ठामपणा असला पाहिजे.. मग सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे होतात,’ असे त्यांचे म्हणणे होते. आत्म निर्भर हा शब्द कोव्हीड साथीने आपल्यात रुजवला.पण ही संकल्पना ४०वर्षांपूर्वीच यांनी विशाखापट्टणम जिल्ह्यातील ५०हून अधिक खेडी आत्मनिर्भर करुन ही कल्पना वास्तवात येऊ शकते याचा भक्कम पुरावा दिला होता. अमेरिकेत संशोधन किंवा नोकरीची संधी सोडून मायभूमीत परतून देशसेवा करण्याचा पर्याय निवडल्याबाबत त्यांनी जराही खंत नव्हती. कारण त्यांचे ध्येय पक्के होते. दृष्टी ठाम होती, त्यामुळेच ते असामान्य होते.

बी. व्ही. परमेश्वर राव यांचे ९ जून २०१९ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..