सुचले होते सारे कांहीं परि, ढळत्या आयुष्यीं
संधिप्रकाश तो दिसत होता, सूर्य अस्ताशीं…१,
काळोखाची भिती उराशीं, लांब आहे जाणे
कळले नाहीं यौवनांत, कशास म्हणावे जगणे…२,
समजून आले जीवन ध्येय, चाळीशीच्या पुढें
खंत वाटली जाणता, आयुष्य उरले केवढे…३,
ज्ञानविषय अथांग होते, अवती भवती
कसा पोहू ह्या ज्ञान सागरीं, विवंचना होती…४,
निराश होऊं नकोस वेड्या, कर्तृत्वाला काळ न लागे
क्षणांत चमकूनी प्रकाश देणें, हीच विजेची अंगे..५,
वर्षा येवून निघून जाते, न्हाऊं घाली धरणीला
हिरवे प्रफुल्लित वातावरणीं, आनंद दिसे सर्वाला…६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply