जीवन गंगा वहाते
फुलवित सारी जीवने
पडेल प्रवाहीं कुणी
लागते त्याला वाहणे ।।१।।
काही काळ वाहतो देह,
डुबून जाणे अंतीम,
कसा वाहतो केंव्हा डुबतो
प्रवाही वेगाचे हे काम ।।२।।
बुडूनी जाती देह प्रवाही,
कर्मे आतील तरंगती ।
वाहत वाहत नदी किनारी,
स्थीर होऊन काठी राहती ।।३।।
देह क्षणाचा जरी,
कर्मे राहती निरंतर ।
कर्तृत्वाच्या कल्पतरूची,
आठवण काढती इतर ।।४।।
त्या कर्माच्या राही आठवणी,
मार्गदर्शक बनती इतरा ।
डुबणाऱ्या देहाकडूनी,
सावध राहूनी कर्म करा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply