जीवन गंगा वहात राही, फुलवित सारी जीवने,
पडेल प्रवाहीं तिच्या कुणी, लागते त्याला वाहणे….१,
काही काळ वाहतो देह, डूबून जाणे लक्ष्य तयाचे
कसा वाहतो केंव्हां डुबतो, वेग ठरवी हे प्रवाहाचे….२,
बुडूनी जाती देह प्रवाही, कर्मे आतील तरंगती
वाहत वाहत नदी किनारी, स्थीर होवून काठी राहती,….३,
देह क्षणाचा जरी, त्याची कर्मे चिरंतर राहती
कर्तृत्वाच्या कल्पतरूनी, इतर जणांना आठवण देती…४,
त्या कर्माच्या राही आठवणी, मार्गदर्शक जी बनती इतरा
डुबणाऱ्या त्या देहाकडूनी, सावध राहूनी कर्म करा….५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply