दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात. विवाहित महिला मोठ्या उत्साहाने साज श्रुंगार करून पीठ गळण्याच्या गाळणीत आधी चंद्र व नंतर आपल्या पतीचे मुखदर्शन घेवून त्यांच्या हातून पाणी पिवून हे संस्कारी व्रत समाप्त करतात.
हिंदू हिंदी भाषीय विवाहित महिला या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व आपल्या संबंधांना अधिक मजबूत करण्या हेतू हे व्रत करतात. ह्या दिवशी अगदी पहाटेच स्नान करून सुर्यनारायणास अर्घ्य देतात. नंतर शंकर भगवानांच्या पिंडीस जल चढवतात. सकाळ ते रात्री पर्यंत अन्न व जल त्याग करून उपाशी राहतात. रात्री चंद्र दर्शन करून पतीच्या हातून पाणी पिवून हे व्रत पूर्ण करतात. चंद्राचे दर्शन पिठाच्या चाळणीतून घेतले जाते. व पतीचे मुखदर्शन घेवून त्याचा आशीर्वाद घेवून पाणी ग्रहण केले जाते. चद्र्देवतेस पतीच्या दीर्घ आयुषी व त्यांच्या संबंधास अधिक मजबूत करण्याचे साकडे घातले जाते. या दिवशी स्त्रिया सुंदर व नवीन पोशाख घालतात घरात मिष्ठान्न बनविले जाते. त्यासोबतच घर चांगले सजवून आपल्या पतीस प्रसन्न करण्याची कोणतीच संधी या दिवशी सोडायची नसते.
पुरातन कहाण्यांपैकी एकामते पूर्वी लोक लढाई वर जात असत त्यावेळी हिंदू महिला आपल्या पतीच्या सुरक्षेसाठी चंद्रदेवतेकडे साकडे घालत व व्रत करीत. पती सुखरूप घरी आल्यास त्याचे मुख चंद्र देवतेसोबत चाळणीतून बघितले जाई. या व्रताला एक उत्सवाचे ही रूप दिले जाते. या दिवशी कृषिप्रधान राज्यांमध्ये शेतात गव्हाची हिवाळी हंगामाचे पिकाची कापणी केली जात असे. यावरून हे व्रत साजरे केले जाऊ लागले. असे काही अख्यायीकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच भारतातील प्रमुख गहू उत्पादक राज्यात हे व्रत उत्साहात केले जाते.
यास करवा चौथ व्रत का म्हणतात?
करवा म्हणजे मातीचा तो भाग ज्याचा वापर गहू ठेवण्यास केला जातो. चौथ म्हणजेच चतुर्थी हा उत्सव हिंदू कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी वर साजरा केला जातो. विशेषतः महिलांचा सन म्हणून याची ओळख आहे.
या दिवशी विवाहित महिला आटा चाळणीतूनच का आपल्या पतीस पाहतात?
ह्या व्रतात पाहते ते रात्रीस चंद्र दर्शन पर्यंत महिला उपवास करून अन्नजल त्याग करून आधी चंद्राचे दर्शन व नंतर आपल्या पतीचे दर्शन पीठ चाळणीतून घेतात. हिंदू धर्म मान्यतेनुसार एका देवासुर, संग्रामात चंद्र्देवांनी भगवान शिव आणि श्रीगणेश भगवानांचे प्रतिनिधित्व केले त्यामुळे या दोघांकडून त्यांना दीर्घायुष्याचा व अमरतेचा आशीर्वाद मिळाला. त्यामुळे या तिथीस चंद्र देवाचे दर्शन, त्यांच्या नावे निर्जल उपवास करून त्यांना मनोचीत प्रसन्न करून त्यांच्या कडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले जाते. महिला यासोबत भगवान शिव आणि गणेशाचा जलाभिषेक करून व्रतास सुरुवात करतात. हिंदू धर्मात या व्रतास फार महत्व आहे. विवाहित महिलेस ह्या व्रताची दरवर्षी आतुरतेणे प्रतीक्षा असते. ह्या व्रतातून ते आपल्या पती प्रती आपले प्रेम दर्शवितात.
राणी विरवाती ची कहाणी
एके काळी एक सुंदर राणी विरवती होवून गेली. ती सात भावात एकच बहिण होती. तिचा पती एका दीर्घ आजाराने आजारी होता. तिने हे व्रत केले. दिवसभर पतीच्या आयुष्यासाठी आपले सर्व काही देवाचरणी ठेवले. रात्री ती चंद्राच्या प्रतीक्षेत वाट बघू लागली तिच्या भावांना तिची हि अवस्था बघवेना त्यांनी चंद्राची नकली प्रतिमा उभी करून तिचा उपवास सोडवला. त्याचवेळी तिचा पती मरण पावला ती रडत राहिली. त्याच वेळी एका देविरूपी स्त्रीने तिला दर्शन दिले. तिने हा उपवास परत कर असे सुचवले. राणी भक्ती भावाने हे व्रत करू लागली. सायंकाळ झाली चंद्र दर्शन घेतले व नंतर मृत पतीचे दर्शन घेतले तोच चमत्कार घडला. तिचा पती पुनरजीवित होवून ठणठणीत तिच्या समक्ष उभा झाला. ह्या सर्वामुळे राणी फारच खुश झाली ती दरवर्षी नित्य नियमाने, उपवास करू लागली. या दंतकथेनुसारच महीला हा उपवास मोठया उत्साहाने करतात.
महाभारतातील प्रसिद्ध दंतकथा
महाभारतातील पांडवपत्नी द्रौपद्री ने ह्या पर्वाच्या महत्वास सर्वप्रथम समजून हे पवित्र व्रत पूर्ण केले अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. हे व्रत माता पार्वतीने भगवान शिव शंकरांना आपला पती म्हणून मिळविण्यासाठी केला होता. यापासून द्रौपदीने हे व्रत केले होते. पांडव – कौरव युद्धात पांडवांचा विजय व्हावा यासाठी द्रौपदीने हे व्रत मोठ्या भक्तिभावाने केले होते. याचा परिणामस्वरूप कौरवांचा नाश झाला.
करवा चौथकरिता तयारी
करवा चौथकरिता महिला सुंदर व नवीन वस्त्रांची खरेदी करत्तात. शक्यतो लाल, गुलाबी वस्त्रांची खरेदी होते. पती आपल्या पत्नीसाठी उचित उपहाराची खरेदी करतात. यासाठी काही स्त्रिया नवीन आभूषण हि खरेदी करतात.
या व्रतासाठी आदल्या दिवशीच घरातील साफसफाई व सजावट केली जाते. महिला एकत्र येऊन हातावर मेहंदी व केसांमध्ये सुगंधी तेल लावतात. रात्रीपर्यंत व्रतासाठी विविध तयारी करतात. पूजेचे सर्व साहित्य तयार केले जाते. अगदी पहाटेच महिला स्नान करून प्रथम अर्घ्य सूर्यास देवून श्रीगणेश व शिवपिंडीचे जलाने अभिषेक करून त्यांची विधिवत पूजा करतात. स्वच्छ व् नविन वस्त्र परिधान करून घरातील वातावरण प्रसन्न केले जाते. ह्या दिवशी महिला आपल्या परिवारासाठी आवडीचे मिष्ठान्न बनवितात. ह एक पवित्र दिवस असल्याजोगे वातावरण घरात निर्माण केले जाते. निर्जल उपवासाचे व्रत धारण केल्यावर घरातील देवघरात विविध फुलांनी व रंगांनी रांगोळी काढून देवघर सजवतात. ह्यानंतर धार्मिक ग्रंथाचे पठन व वाचन केले जाते. महिला आपला वेळ जावा यासाठी एकत्र येवून एकमेकांच्या तयारीबद्दल चर्चा करतात. पंजाब,उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये पती आपल्या शेतातील गव्हाचे पिक कापून त्याच्या लोंब्या एका ठिकाणी लावतात. ग्रामीण भागात सर्वाकडे प्रसन्न वातावरण असते.
सायंकाळी पारंपारिक पूजेची तयारी करतात. नवीन वस्त्र धारण करून चांगला साज श्रुंगार करून आभूषण घालून एक नवरीप्रमाणे सजून आपल्या प्रिय चंद्राच्या दर्शनासाठी वाट बघतात.महिला या दिवशी लाल,गुलाबी आणि पिवळ्या नवीन वस्त्रांना परिधान करतात. पूजेच ताट सजवून तयार असतात. भारतात अलग अलग राज्यांमध्ये विवीध पद्धतीने पूजा केली जाते.
या दिवशी प्रसिद्ध करवा चौथ कथांचे पठन केले जाते. काही पारंपारिक गीतांचे पठन व गायन केले जाते. उत्तर प्रदेशात महिला एकत्र येवून गोलाकारात बसून विशेष पद्धतीने गीत गायन करतात. या गायनात उपवासाचे महत्व सांगितले जाते. गीतांचे सात फेरे होतात यात पहिल्या सहा फेरीत उपवासाचे महत्व सांगितले जाते. व सातव्या फेरीत उपवासाच्या शेवटाबद्द्ल सांगितले जाते.
पहिल्या सहा फेरीत
“वीरो कुडीये करवा सर्व सुहागन करवा एक कट्टी नया तेरा ना, कुंभ चरखा फेरिना आर पैर पायी ना रूढदा मनिये ना सूत्र जगाई ना, वे विरो कुरीये करवा वे सर्व सुहागन करावा.”….
तर सातव्या फेरीत
“वीरो कुडीये करवा सर्व सुहागन करवा एक कट्टी नया तेरी ना, कुंभ चरखा भी आर पैर भी रूढदा मनिये भी सूथरा जगाई भी, वे विरो कुरीये करवा वे सर्व सुहागन करावा.”….
अशा लोकप्रिय फेऱ्यांच्या गीतांची धमाल उडवली जाते. बघता बघता चंद्र दर्शनाची वेळ जवळ यायला लागते. उत्तरी राजस्थान मध्ये महिला इतर महिलांना सात वेळा “धापी कि न धापी?” प्रश्न विचारतात ज्याचे उत्तराच्या रूपाने “जलसे धापी, सुहाग से न धापी” असे म्हणून वातावरण निर्मिती केली जाते. सोबतच गौरी मातेची आराधना करून त्यांच्या कथा गायिल्या जातात. ज्यात मा पार्वती व गणेश भगवानांची स्तुती केली जाते.
पुजीची थाळी मुख्यत्वे कुंकू, हळद, फूल, अगरबत्ती, कापूर व तिलकासाठी कुंकू तांदूळ ठेवले जाते.
राज्श्तन मध्ये महिला एकमेकांना “सदा सुहागन कर्वे लो पती कि प्यारी कर्वेलो सात भाईयो के बहेन नि कर्वे लो, सास कि प्यारी कर्वे लो.”
म्हणून त्यांचे प्रोत्साहन वाढवतात. सर्व महिला चंद्र दर्शनासाठी आतुर झालेले असतात. चंद्राचे दर्शन होताच त्यास नमन करून त्याची विधिवत पूजा केली जाते. मनात शुभ कामना ठेवून त्यासोबत पतीच्या दीर्घायुष्याकरिता मनोचीत्त मागितले जाते. नंतर पतीची तिलक करून, आरती ओवाळून पूजा केली जाते.चंद्राचे मुख्य चाळणीत बघून पतीचे मुख चाळणीतून बघितले जाते. नंतर पतीच्या चरणास स्पर्श करून त्याचा आशीर्वाद घेतला जातो. नंतर पतीच्या हातून जळ ग्रहण करून उपवास तोडला जातो.
याप्रकारे पती आपल्या पत्नीचे प्रेम समजतात. व तिच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा आशीर्वाद देवून सुंदर उपहार पत्नीस देतात.
एक दुसऱ्याच्या प्रेमास मान्य करून त्यास अशा माध्यमाने सांगणे फारच प्रेममय आणि पवित्र मानले जाते.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट/ माझी मराठी.कॉम
Leave a Reply