काशी विश्वनाथ धाम हे भारतीय संस्कृती आणि श्रद्धा यांचा सर्वात जुना आणि महान केंद्रबिंदू आहे.
आज ते गेल्या तीन हजार वर्षातील सर्वात मोठे आणि भव्य स्वरूप अनुभवत आहे. 250 वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिरोे नूतनीकरण केले. त्यानंतरचे हे सर्वात मोठे नूतनीकरण आहे.
काशी विश्वनाथ मंदिराचे बांधकाम, विध्वंस आणि पुनर्बांधणीचा संक्षिप्त इतिहास जाणून घेऊया.
1. इ.स.पू. 9-10 व्या शतकातील अविमुक्तेश्वर विश्वेश्वरा विश्वनाथ राजघाटाजवळील उत्खननात सापडला.
2. इसवी सन 500-508 – विश्वनाथ मंदिर वाण्यगुप्ताच्या राज्यात बांधले गेले.
3. इसवी सन 635 – ह्युएन सॉन्ग या चिनी प्रवाशाने मंदिराचे वर्णन केले आहे.
4. 10वे – 11वे शतक – बांस फाटकावर आजची बीबी रझिया मशीद जिथे उभी आहे तिथे मंदिराची स्थापना झाली.
5. इसवी सन 1194-97 – मुहम्मद घोरीच्या आदेशावरून कुतुब-अल-दीन ऐबकने मंदिराचे नुकसान केले.
6. इसवी सन 1230 – इल्तुतमिशच्या कारकिर्दीत त्याची पुनर्बांधणी झाली.
7. इसवी सन 1447 – जौनपूरच्या महमूद शाह शर्की यानेते पुन्हा पाडले.
8. इसवी सन 1584-85 – अकबराच्या राज्यात तोडरमलच्या संरक्षणाखाली मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.
9. इसवी सन 1632 – शाहजहानने ते पाडण्यासाठी कूच केले परंतु अयशस्वी झाले.
10. 17 एप्रिल 1669 – औरंगजेबाने ते पाडण्याचा आदेश दिला.
11. 2 सप्टेंबर 1669- औरंगजेबाच्या आदेशानुसार मंदिर पाडण्यात आले.
12. इसवी सन 1776-77- अहिल्याबाई होळकरांनी मंदिराची पुनर्बांधणी केली.
13. इसवी सन 1883 मध्ये महाराजा रणजित सिंग यांनी मंदिराच्या शिखरावर 40 मण (सुमारे 2 टन) सोन्याचा कळस बसवला. .
14. डिसेंबर 1992 – अयोध्येतील घटनेनंतर ज्ञानवापी मशिदीच्या बाजूला असलेल्या शृंगार गौरीची पूजा बंद करण्यात आली.
15. 15 मार्च 2019- काशी विश्वनाथ धामचे बांधकाम सुरू झाले.
16. पंतप्रधान मोदी यांनी 13 डिसेंबर 2021 रोजी त्याचे लोकार्पण केले.
— मराठीसृष्टी टिम.
Leave a Reply