आफ्रिका खंडात पर्यटनाला जाण्याची कल्पना आपल्याला युरोपात जाणे इतकी आकर्षक वाटत नाही मात्र डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या या पुस्तकातील केनियाच्या सफरीचे वर्णन वाचून आफ्रिकेत जाण्याचे वेध लागले नाहीत तरच नवल!
डॉक्टर श्रोत्री हे मुळातच निसर्गप्रेमी असल्याने त्यांची ही सफर प्राणी-पक्ष्यांच्या विश्वाची सफर आहे केनियाचे भूमी ही निसर्गाच्या मुक्त वरदानाची भूमी आहे असं ते सांगतात नैरोबी सांबरु उद्यान रिफ्ट व्हॅली लेक नाकुरू मसाई मारा लेक नैवाशा माऊंट किलीमांजारो आधी जगप्रसिद्ध ठिकाणांना त्यांनी दिलेल्या भेटींविषयी ते तपशीलाने सांगतात.
या भेटीदरम्यान त्यांना विविध प्राणी आणि पक्षी पाहायला मिळाले भूशास्त्रीय चमत्कार त्यांना दिसले क्षारयुक्त प्राण्याची सरोवरे गंधक युक्त गरम पाणी घनदाट जंगले या साऱ्यांच्या साथीने हा प्रवास अविस्मरणीय ठरला पुस्तकात केनियाचा नकाशा व स्वाहिली भाषेविषयीही माहिती दिली आहे
लेखक : डॉ. संदीप श्रोत्री
पर्यावरण विषयक, पर्यटन, प्रवास वर्णन
मैत्रेय प्रकाशन
पाने : 128
Leave a Reply