नवीन लेखन...

कथा गणेशाच्या

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०२१६ स्नेहल नांदेडकर ह्यांनी लिहिलेला हा लेख)


जपानमध्ये गणपतीची २५० देवळे आहेत. कन्जिटेन या नावाने तो तिकडे ओळखला जातो. कन्जिटेन म्हणजे भाग्यदेवता. सुखकर्ता, समृद्धी देणारी देवता. मध्य अशिया आणि जगातल्या अन्य भागात गणपती या देवतेची फार पूर्वी साग्रसंगीत पूजाअर्चा कशी होत असे ते ऑक्सफर्डने प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तकातून वर्णिले आहे. गणपतीचे वेगवेगळे पुतळे अफगाणिस्तान, इराण, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, चायना, मंगोलिया, जपान, इंडोनेशिया, ब्रुनेई, बल्गेरिया, मेक्सिको आणि इतर लॅटीन अमेरिकन देशातून आढळतात. यावरून हेच स्पष्ट होते की प्राचीनकाळात गणेश संप्रदाय जगभरातल्या अनेक देशातून पसरला होता.

युरोप, कॅनडा आणि युएसए मधील गणपती:
युरोपियन देशांमध्ये गणेशमूर्ती, गणेशाची चित्रे आणि गणेशाची वस्तुसंग्रहालये आढळतात. युके, जर्मनी, फ्रान्स व स्वित्झर्लंड या देशातून गणेशदेवतेची म्युझियम्स विशेष प्रसिद्ध आहेत. या देशातल्या सार्वजनिक ठिकाणी अशी संग्रहालये तर आहेतच, पण व्यक्तीगत घराघरातून, कचेऱ्यातून मोठ्या कलावंत, लेखकांच्या बंगल्यातून आणि यशस्वी उद्योजकांच्या ऑफिसातूनसुद्धा गणेश देवतेच्या विविध रूपातल्या प्रतिमांचे दर्शनही कॅनडा आणि युएसए देशातून हमखास घडते. बल्गेरिया देशातल्या सोफिया शहराजवळच्या एका खेड्यातल्या उत्खननातून एक प्राचीन मूर्ती मिळाली ती गणेश देवतेचीच होती. हिंदू लोकांप्रमाणेच रोमन्ससुद्धा शुभकार्याला गणपतीच्या पूजेनेच सुरुवात करतात. गणपती ही देवता भाग्यसूचक आहे अशी आयरिश लोकांची दृढश्रद्धा आहे.

नवी दिल्लीतल्या आयर्लंड देशाच्या वकिलातीची इमारत ही पहिलीच युरोपियन इमारत आहे की जिने आपल्या कचेरीच्या प्रवेशद्वारीच गणपतीचा मोठा पुतळा उभारला आहे.

अमेरिकेतल्या सिलीकॉन सायबरस्पेस टेक्नॉलॉजीचा अनावरण सोहळा गणेश देवतेच्या शुभहस्ते केला. गणेश ही बुद्धीची देवता आहे, असे पाश्चात्त्य देशही मानतात.

सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आपल्या कल्पना आणि नवसंशोधन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी ज्या श्दलेचा मुख्य वापर करतात ते वाहन ही गणपतीचेच आहे ही मुद्दाम लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. जगातल्या सिलिकन व्हॅलीतल्या कॉम्प्युटर इंडस्ट्री असोसिएशन या जगप्रसिद्ध संस्थेने गणपती देवतेलाच Presiding Deity म्हणून निवडले आहे हेही मुद्दाम लक्षात ठेवण्याजोगे आहे.

ग्रीक देशातल्या चलनी नाणी-नोटांवर गणेशाचे चित्र आहे. इंडोनेशियाच्या नोटावरही तसे चित्र आहे. गणपतीचे वेदकालीन मूळही शोधले गेले आहे. ते दहा हजार वर्षांपूर्वी इतके प्राचीन आहे. यजुर्वेदातली १६/२५ ऋचा नमो गणेभ्यो गणपती किंवा मार्गातले अडथळे दूर होवोत अशा अर्थाच्या प्रार्थना वैदिक वाङमयात आढळतात.

गणेश हा सर्व शुभकार्याच्या आधी पूजला जातो. गणपती ही शैव परिवारातील प्रमुख देवता आहे. आर्येतर अशी ही देवता आहे. गण किंवा समूह हे हत्तीचे पूजन करीत. यातून गणेश पूजा विकसित झाली. मग वैदिकांनी त्या पूजेचा स्वीकार केला. गणेशाची गणना शंकराच्या गणात झाली. शिव पार्वती पुत्र गणेश झाला. त्याला गजमस्तक कसे जोडले, याबाबत पुराणकथांची नाही. गणपती अयोनिज आहे. त्या वेगवेगळ्या कथा आपण जाणून घेऊ. तो एक शिवपुत्र आहे. शिवाने आपल्या तपःसामर्थ्याने तेजस्वी बालकाची निर्मिती केली. त्या सुंदर पुत्राला आपल्या साहचर्यावाचून एकट्या शिवानेच जन्म द्यावा याचा मत्सर पार्वतीला वाटला. तिने त्याला शाप दिला व बेडौल गजमुख बनविले. एकदा पार्वतीने शनीला गणपतीकडे पहावयास सांगितले. शनीने त्याच्यावर दृष्टी टाकली. त्यामुळे गणपतीचे मस्तक गळून पडले. पार्वती शोकाकुल झाली. ब्रह्मदेवाकडे गेली. त्याने सांगितले तुला प्रथम ज्या प्राण्याचे मस्तक मिळेल, ते तू गणपतीच्या देहाला लाव. पार्वती मस्तक शोधू लागली. तेव्हा तिला प्रथम गजाचे मस्तक मिळाले. ते तिने गणपतीच्या देहाला लावले. तो गजमुख झाला.

शिवपार्वती एकदा हिमालयावर विहार करीत होते. त्यांना हत्तीचे जोडपे रतिक्रीडा करतांना दिसले. त्यांनीही गजरूप घेऊन रतिक्रीडा केली. त्यांना गजमुख पुत्र झाला. अशा अनेक दंतकथा आहेत.

शिव हा प्राचीन काळी भूतानचा राजा होता. शिवाची राजधानी कैलास होती. तेथे सणावाराच्या दिवशी लोक पशुपक्ष्यांचे मुखवटे धारण करीत असत. त्यातून गणपती गजमुख याच्याशी जुळणारी कल्पना केली. शिवपार्वती गजचर्म धारण करीत. रूद्र आणि विनायकाचे गण वनात रहात होते. तेथे हत्तीही होते. त्यामुळे गजमुख गणपती झाला. गणेश अवैदिक असे पाश्चात्य विद्वानांचे मत.

ब्रह्मणस्पति ही वैदिक देवता. गणेश हा ज्ञानदाता होता.सुवर्ण परशु हातात आहे. तामिळनाडूमध्ये गणपतीला ब्रह्मणस्पति म्हणतात. कार्यारंभी गणपतीचे आवाहन करतो तसेच ब्रह्मणस्पतीचेही केले जाते.

गणानां त्वां गणपतिं हवामहे, कवि कविनामुपश्रवस्तम्।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत

आ नः शृण्वन्तु तिभिः सीद सादनात् (ऋ २:२३:११ ) समुदायाचा ईश्वर (प्रभु) म्हणून तू गणपती. ज्ञानीजनात तू अत्यन्त ज्ञानी. कीर्तिवन्तांमध्ये तू वरिष्ठ, तूच राजाधिराज.
तुला आम्ही आदराने बोलवितो. तू आपल्या सर्व शक्तींसह ये आणि आसनावर विराजमान हो.

अनेक जमातींच्या देवतांचे एकीकरण झाले. शिव गणपती शिव परिवारातील देवता. परंतु शिव-गणेश देवता पूर्वी एकरुपच होत्या. अथर्वशीर्षात त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्र असे आहे. तात्विकदृष्ट्या ते तसे नाही. दैवतशास्त्राप्रमाणे ते सत्य असावे. गणेश व शिव साम्य आहे. भालचंद्र, नागभूषणे हे शिवभूषण. गजवदनम् चिन्त्यम् ध्यान श्लोकात गणेशाला त्रिनेम म्हटले आहे. त्याच्या कमरेभोवती नागबंध – गणेशाने अनलासुराचा वध केल्यावर देहाचा दाह शांतीसाठी सर्प, चंद्र इ. शीतलोपचार केले होते.

गणेश पुराणातही अशी कथा आहे.
तैत्तरीय आरण्यकात रुद्र गायत्री व गणेश गायत्री यांच्याशी साधर्म्याचा मंत्र तत्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमही! तन्नो दंती प्रचोदयात् त्या काळात शिवाला तत्पुरुष-वक्रतुण्ड, दन्ती म्हणत होते. दक्षिण कोकणात शिवपूजेनंतर गणेश पूजन होते. एकदन्ताविषयी अनेक कथा आहेत. कृषीदेवता, गजवक्त्र, परशुरामाने परशु फेकला म्हणून एकदन्त शंकराने क्रूद्ध होऊन एक दात मोडला इ. विनायक हे लोकप्रिय नाव.

उंदीर हा गणेशाचा पशु आहे. गणेश विज्ञानात आहे. हे रुद्रा, उंदीर तुझा पशु आहे. जेव्हा गणेश भिन्न मानला गेला. तेव्हा त्याचे वाहन उंदीर झाले.

मूषक गणपती
दिवसा पृथ्वीखाली लपलेला अंधार हा मूषक, सूर्य मावळताच लपत छपत पृथ्वीवर येतो. भ्रमण करतो. गणेश म्हणजे सूर्य गणपती उंदरावर स्वार म्हणजे सूर्य उगवताच अंधार नष्ट होतो.

आध्यात्मिक गणपती – अथर्वशीर्षाचे सार. तू तत्त्व, प्रत्यक्ष ब्रह्म, आत्मा, ज्ञानमयोसि विज्ञानमय वाक् विद्या – ओंकार रूप. ओंकार (ॐ) आडवा उभा केला की, गजवदन -ग- सर्वांचे लय, ज- ज्यापासून गज, ब्रह्म, चिंतामणी – चित्ताच्या पाच भूमिका प्रकाशणारा. शांती लाभ देणारा – वक्रतुंड, वक्र – माया – तुंड ब्रह्म मायेचा अधिष्ठाता परमेश्वर.

गणपतीला लाल वस्त्र, लाल फुले, रक्तचंदन आवडतात. मूलाधार चक्राचा स्वामी आहे. गणेश-ज्योती स्वरुप अग्नि, उदयारूढ – सूर्य लाल रंग. गणपती सृष्टिकर्ता रजोगुणी लाल रंग. मुद्गल पुराण रक्तवर्णासुराने गणेशाने ते रूप धारण केले. सिंदुरासुराचे रक्त गणेशाने आपल्या अंगाला माखले. रक्तवर्ण. गणपती तत्सम वन्य देव पशूंच्या रक्ताने रंगले आहेत.

चतुर्थी – गणेशाची प्रिय तिथी आहे. शुक्लपक्ष चतुर्थी विनायकी. वद्य चतुर्थी – संकष्टी. भाद्रपद शुक्ल पक्षतिथी गणेशोत्सव. यात एक रहस्य चतुर्थी जागृति स्वप्न सुषुप्तीच्या पलीकडची तुरीया अवस्था. जीवाचे परम साध्य. अंगारकी.

दुर्वा – शमी मंदार – या तीन वनस्पती प्रिय. दुर्वा ब्रह्मदेवाच्या शरीरातून निर्माण झालेली सुंदर देवता. तिने तप केले. गणेशाला च प्रिय. कालांतराने तिला आपल्या वैभवाचा गर्व झाला. ती उं जगदंबेहून श्रेष्ठ मानू लागली. पार्वतीने शाप दिला. पृथ्वीवर वा तृणरुपात जन्म. त्यातूनही तपोबलाने ती मुक्त. और्वऋषि प शमिका-कन्या धौम्य ऋषीपुत्र मंदार यांचा विवाह झाला. ग आश्रमात भृशुंडी ऋषी आले असतांना त्याचे मोठे पोट व स्थूल श शरीर पाहून ती दोघे त्यांना हसली. तेव्हा ऋषीने शाप दिला की हॅ तुम्ही दोघे वृक्षयोनीत जन्म घ्याल. त्यामुळे शमी मंदार बनली. श्‍ भृशुंडीचा शाप खोटा ठरणार नाही. गणेशाने मंदार वृक्षाच्या उ मुळाशी वास करीन व शमीपत्रे मला प्रिय होतील.

• तांत्रिक गणेश –
तंत्र ग्रंथात गणपतीचे अनेक प्रकार आहेत. विविध ध्यानेही आहेत.

• बौद्ध गणेश –
बुद्धाने आपल्या आनंद शिष्याला रहस्यमय गणपती मंत्र सांगितला. बौद्ध धर्मात गणेश. बौद्ध धर्माबरोबर गणेश भारताबाहेर गेला. अनेक मूर्ती सापडतात. तशाच विचित्र मूर्ती आहेत. तिबेट, तुर्कस्तान मठाच्या द्वारावर रक्षक म्हणून. महायान बौद्ध गणपतीहृदय मंत्राने गणेशोपासना. चिनी विद्वान, जपान, ब्रह्मदेश, सयाम, कंबोडिया, जावा, बाली, बोर्निओ, तर्कस्थान, मेक्सिको इ. गणपती आढळतात. पाषाण, धातू, मूर्ती आढळतात.

• गणेशाचे अवतार
गणपतीचे महोत्कट, विनायक, गणेश, धूम्रकेतु असे चार अवतार गणेश पुराणातही वर्णन केले आहेत.

महोत्कट विनायक – राक्षम – देवान्तक, नरान्तक ठार केले. धर्मरक्षण. इतरही अनेक पराक्रम.
वाक्चातुर्य, संघटन कौशल्य, युद्धनीती, शौर्य धैर्य हे गुणविशेष. गणेश – त्रेतायुग – उमेच्या पोटी जन्म भाद्रपद शु. ४ गुणेश जन्म. सिंधु दैत्यास ठार केले. सिध्दी-बुद्धी ह्या ब्रह्मदेवाच्या कन्यांशी विवाह केला.

धूम्रकेतू – कलियुगात धूम्रकेतू – धूम्रवर्ण चौथा पेल
गणेश – द्वापारयुग पार्वतीचा पुत्र होता.
महोत्कट- कृतयुगात जन्म. कश्यप आदिती पुत्र अनेक पराक्रम केले.

गणेशाच्या अनेक मूर्ती. प्रारंभी हा द्विभुज होता. जपानमध्ये चतुर्मुख मूर्ती. तिबेटात नारीरूप असे विविध मूर्तीचे प्रकार आहे. उंदीर गणपतीचे वाहन. पण इतर वाहने आहेत. हेरंब गणपतीचे वाहन सिंह. मयुरेश्वराचे वाहन मोर आहे. कधी समभंग मुद्रेत, पद्मासन स्थित, नृत्यमुद्रेत, हरिद्रा गणपती ऊर्ध्व गणपती, पिंगल गणपती, लक्ष्मी गणपती, शुभ्रवर्णाचा हिमालयात मुंडकटा-शिर नसलेला गणपती. गणपतीच्या मातीच्या मूर्तीची पूजा होते. दक्षिणेकडे पिल्लौयार नावाने यज्ञकुंड स्वरुपात पूजन. शंकराचार्यांनी पंचायतन गणपतीला स्थान दिले. डाव्या व उजव्या सोंडेच्या गणपतीचे पूजन केले जाते. ज्ञानेश्वराने षड्भुज गणेशाचे स्तवन केले. अथर्ववेदात गणेशाचे स्वरूप व्यक्त झाले.

अथर्वशीर्षात गणेशाला त्वं ब्रह्मासि हे ब्रह्मस्वरूप समाजात सर्व थरात जाण्याचे कार्य पुराणकारांनी केले. गणेश संप्रदाय वाढले. गणेशाचे माहात्म्य कायम आहे.

वाङ्मय – गणेश पुराणे, गणेश गीता, गणेश स्तोत्रे, गणेश मंत्र तंत्र विधाने इ. वाङ्मय येते. गणेश पुराण हा गाणपत्य संप्रदायाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. मुद्गल पुराण, दुसरा ग्रंथ – अथर्वशीर्ष महत्त्वाचे आहे. अजूनही गणेश वाङ्मय अप्रकाशित आहे. लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणपती पसंत पडला आणि लेख लिहून १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. बहुजन समाजात लोकसत्ता प्रसार केला. सार्वजनिक गणेशोत्सवात पोवाडे, मेळे, भावगीत गायन इ. कार्यक्रम करीत. आता त्याचे स्वरूप बदलले आहे. गणेशाला नैवेद्य म्हणून गूळखोबरे फार आवडते. मोदक हे प्रिय खाद्य. त्यात आता अनेक प्रकार आहेत. पंचखाद्याचा नैवेद्यही चांगला आहे. या सर्व खाद्य प्रकारात आता खूप विविधता आली आहे. गणेश हा सर्वांचा लाडका बाप्पा आहे. म्हणून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणून आपल्या बाप्पाला गहिवरलेल्या अंतःकरणाने निरोप देतो.

एकदन्तं शूर्पकर्ण गजवक्त्रं चतुर्भुजम् ।
पाशाङ् कुराधरं देवं मोदकं ब्रिभतं भजे ।।

एकदन्त, सुपासारखे कान असलेल्या गजमुख, चतुर्भुज पाश, अंकुश मोदक धारण करणाऱ्या गणपती देवाचे मी भजन करतो.

-स्नेहल नांदेडकर, ठाणे

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..