कथ्थक नृत्यांगना व गुरु डॉ. टीना तांबे यांचा जन्म १८ जून १९७७ रोजी इंदोर येथे झाला.
टीना तांबे यांनी रंजना ठाकुर, डॉ सुचित्रा हरमलकर, व पंडित रामलाल यांच्या कडून कथ्थकचे शिक्षण घेतले,पुढे २००१ मध्ये मुंबईत येऊन त्यांनी गुरु उमा डोगरा यांच्या कडे शिक्षण घेतले. त्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडल, मुंबई येथून नृत्य अलंकार शिक्षण घेतले आहे, तसेच त्यांनी देवी अहिल्या विश्वविद्यालयतून ‘कथ्थक’ या विषयात एम ए केले आहे.
टीना तांबे यांनी इंडिया हॅबिटेट सेंटर, नेहरु सेन्टर, लंडन, नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स, भारत भवन, नेहरु विज्ञान केंद्र, मुंबई व नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ कथ्थक डांस येथे आपले कार्यक्रम केले आहेत. टीना तांबे यांनी या बरोबरच इंटरनेशनल डॉक्यूमेंट्री फिल्म फेस्टिवल, काला घोडा कला महोत्सव, नटराज गोपीकृष्ण संगीत महोत्सव, कालिदास समारोह, खजुराहो डान्स फेस्टिवल व स्वामी हरिदास संगीत संमेलेन तसेच श्रीलंका, मलेशिया व ग्रीस अशा ठिकाणी आपली सेवा सादर केली आहे.
डॉ. टीना तांबे यांची ‘निनाद नृत्यशाळा’ नावाने ॲकाडमी असून त्यात कथ्थक नृत्य शिकवले जाते, कार्य शाळा भरवल्या जातात.
डॉ. टीना तांबे यांचे संकेत स्थळ.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply