नवीन लेखन...

कठोर शिक्षा – भाग १

दुसर्या दिवशी नानू जागा झाला ते राऊत सरांचा विचार करतंच.!

“हे रे काय? तू अजून राऊत सरांचाच  विचार करतोयंस? त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून दे. नाहीतरी तू कांहीं त्यांना मदत करूं शकणार नाहींस. हो नां?” रजनीने वियारलं

“ ते खरं आहे. मी त्यांना काहीच मदत करूं शकत नाही, पण इतक्या सज्जन आणि सन्मान्य व्यक्तीवर असा प्रसंग का यावा, त्यांची अशी दुर्दशा का व्हावी हे मला समजलं पाहिजे. मला नाहीतर चैन पडणार नाही. हो. आज कोर्टाला सुट्टी आहे. सरांचा पत्ता मी कोर्टाच्या  कागदातून लिहून घेतला आहे.” तो ठांसून म्हणाला.

“  जा, बाबा, देव तुझं भलं करो”  ती म्हणावी, पण माझ्या शाळेला सुट्टी नाहीं” ती म्हणाली.

 

नानू स्वतच गाडी चालवत राऊत सरांच्या शोधांत निघाला. “स्नेहा अपार्टमेण्टस” अशी पाटी लावलेली भव्य इमारत दिसली. फाटकापाशी गणवेषांतला चौकीदार दिसला. नानूने त्यालाच विचारायचं ठरवलं.

“इथे तुम्ही गाडी उभी करू शकत नाहीं, साहेब ”  चौकीदारानें हटकलं.

“इथे बेंद्रे चाळ कुठे आहे?” ऩानूने विचारलं.

.”तिथे तुम्हाला कोण हवंय?” चौकीदाराने विचारलं.

“रघुनंदन राऊत”  नानू म्हणाला.

“ कोण, रघू ?  रात्रपाळीचा चौकीदार?”  चौकीदार म्हणाला.

राऊतसरांबद्दल इतक्या अनुदारपणे बोलणारा माणूस नानूला आवडला नाही पण पत्ता मिळाला ह्याचाच  त्याला आनंद झाला.

“ह्या रस्त्याने सरळ जा. रस्त्याच्या शेवटी तुम्हाला बेंद्रे चाळ सापडेल तुम्हाला रघू भेटेल.  तुम्ही गाडी इकडेच ठेवा. मी लक्ष ठेवतो”  तो म्हणाला.

गाडी तिथेच ठेऊन नानू पायी  निघाला. गलिच्छ रस्ता  ओंगळ झोपडपट्टी रस्च्यातच क्रिकेट खेळणारी पोरं हे सर्व  ओलांडून तो बेंद्रे चाळीतल्या खोली नंबर पांच इथे पोहोंचला. दार उघडंच होतं.

नानूने दाराची कडी वाजवली.

“कोण रे?” राऊत सरांचा काहींसा त्रासिक आवाज ऐकूं आला.

“सर, मी  नानू, तुमचा जुना शिष्य.” नानू चांचरत म्हणाला.”मी आंत येऊ कां?”

“मला वाटलंच होतं, तूं येणार असं. आजवर कोणत्या वकीलाने आपली फी सोडून दिली आहे?” सर म्हणाले. राऊत सरांच्या या उद्गाराने नानूला गडबडल्या सारखं झालं.

“ नाहीं सर, मला इतर वकीलांसारखा नीच समजूं नका. आई शप्पत !” त्यांने आपल्या गळ्याला उजव्या हाताचा चिमटा लावला.

“तुम्ही कसे आहांत अशी चौकशी करायला आणि शक्य झाल्यास काही मदत करावी या उद्देशाने मी आलो आहे, सर !”  असं तो कळवळून म्हळाला.

“मला पटतंय रे. मी तुला दोष देत नाहीं. पण मी तुला रिक्त हस्ताने परत पाठवणार नाही. अरे तू अजून उभाच आहेस?  त्या स्टुलावर बैस” राऊत सरांनी एकुलती एक स्टूल सरकवली.

“अरे हो, त्या कपाटावर एक काळा लांकडी खोका आहे, तो काढून दे”  राऊत सर न्हणाले नानूवे तो खोका काढून सरांना दिला. सरांनी तो परत नानूला दिला. नानूने त्या खोक्यावरची धूळ झटकली. “ राहूं दे रे ती धूळ. उघड तो खोका आणि बघ काय आहे त्यात“  सर म्हणाले.

“क्लैरीनेट?” नानू चकित झाला. “हे तुम्ही कैक वर्षांपूर्वीपासून वाजवत आहांत. हे तुमचंच वाद्य आहे. होय नां?” नानूने कौतुकाने   विचारलं.

“ ते माझं होतं. आत्ता ते तुझं आहे. मला माहित आहे, ह्याची किंमत तुझ्या फी ची किंचितही भरपाई करूं शकणार नाही, पण माझ्याकडे इतकंच तुला देण्यासारखं आहे रे, नाहीं म्हणूं नकोस. हे सियालकोटचं वाद्यं एबोनाईटपासून बनवलेलं आणि दुर्मिळ आहे. बाजारात याला आज कांहीच किंमत नसेल पण तुलाच याची किंमत कळेल म्हणून मी हे वाद्य तुला देत आहे” राऊत सरांचा सूर भारावला.

“पण सर, हे तुमच्या हातातलं वाद्य. ते मला देऊन तुम्ही काय वाजवणार?”

नानूचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वी राऊत सरांनी नानूच्या हातात आपले दोन्ही हात दिले. “ नीट बघ, ह्या हातांची बोटं कशी आखडली आहेत. ह्या बोटांना आत्ता क्लैरिनेट कधीच वाजवता येणार नाहीं” सर म्हणाले.

नानूचं लक्ष सरांच्या बोटांकडे गेलं. ती बोटं आगीत होरपळून भाजून गेल्यासारखी दिसली.:”हे काय सर, कसल्यातरी अपघातात बोटं भाजली गेली काय? “ नानूला धक्काच बसला.

“ ते तूं मला विचारूं नकोस रे बाबा, ही त्या पांडुरंगाची इच्छा आहे, त्याने मला दिलेली कठोर शिक्षा आहे” असं म्हणताना सरांचा कंठ दांटून  आला.

“ आत्ता ते सर्व विसरूंया तू आज प्रथमच माझ्याकडे पाहुणा म्हणून आला  आहेस,.. तुला काय आवडतं?” सरांनी उत्तराची वाट न पहाता, “बापू,” अशी हांक दिली. अकरा- बारा वर्षांचा एक लहान मुलगा दारापाशी आला.  “अरे बापू, दोन गरम वडा पाव आणि दोन कटिंग आण रे, ,अरे नानू, कटिंग म्हणजे काय, तुला माहित असेलच नां?” सरांनी हा प्रश्न नानूला विचारला.

“ होय सर, मीही तुमच्याच प्रमाणे मुंबईकर आहे. कटिंग म्हणजे आर्धा ग्लास चहा. होय नां?”  नानू म्हणाला.

“ तूं आलास, मला बरं वाटलं, तू केलेल्या मदतीबद्दल तुझे मी जितके आभार मानावे तितके थोडे आहेत”  सर म्हणाले.

“वास्तविक मी तुमचे  आभार मानतो सर,   दोन कारणांकरतां. – एक म्हणजे अत्यंत मौल्यवान अशी ही वस्तु- हे क्लैरिनेट मला दिलंत आणि माड्यावर विश्वास दाखवलात. मी आणखी एक गोष्ट मागणार आहे, नाही म्हणू नका.  मी तुमच्या पायाना स्पर्ष करून तुमचे आशिर्वाद घेणार आहे. मला तुमचे आशिर्वाद विश्वमोलाचे आहेत. हो, तुमची अशी परिस्थिती कां झाली हा मला सतावणारा प्रश्न मी आज विचारणार नाहीं, पुन्हा कधीतरी.” असं म्हणून  नानूने  सरांच्या पायांना स्पर्श केला. त्यांचे आशिर्वाद घेतले. परत निघाला.

एकीकडे त्याला आनंद झाला होता, ऱाऊत सर भेटले, त्यांचा आशिर्वाद मिळाला होता, त्याचं आवडतं वाद्य तेही खुद् सरांच्या हातातलं- त्याला बक्षिस मिळालं होतं, त्याचबरोबर मूळ प्रश्न तसांच राहिला होता ही खंत तशीच राहिली, सरांची होरपळलेली बोटं हे नवं कोडं निर्माण झालं होतं.

कांहींशा द्विधा मनस्थितीत तो घरी परतला.

Avatar
About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..