आघात होऊनी परिस्थितीचे,
सही सलामत सुटत असे,
संकटाची चाहूल लागूनी,
परिणाम शून्य ठरत असे ।।१।।
दु:खाची चटकती उन्हे,
संरक्षणाची छत्री येई,
कोणती तरी अदृष्य शक्ती,
त्यास वाचवोनी निघून जाई ।।३।।
दूर सारूनी षडरिपूला,
मनावरती ताबा मिळवी,
प्रेमभाव अंगी करूनी,
तपशक्तीला सतत वाढवी ।।३।।
तपोबलाचे बनूनी कवच,
फिरत होते अवती भवती,
दु:खाचे वार झेलुनी,
रक्षण त्याचे सदैव करीती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply