कविता नाही माझी बेबी ट्युबमधली ।
कविता नाही माझी दत्तककन्येसारखी ।
सिझरिंग मधून ती नाही बाहेर आलेली ।
नऊ महिने पूर्ण झाल्यावर त्या वेदनेतून जन्मलेली ।।१।।
जे जे भोगले त्याची खूण आहे ती ।
माझ्या प्रत्येक माराचा व्रण आहे ती ।
माझ्या स्वत:च्या रक्ताचा थेंब आहे ती ।
माझ्या मनाची पडछाया आहे ती ।।२।।
ती कुठेही गेली तरी असणार आहे माझी ।
तीने सुखी करावं सर्वांच ही आस आहे माझी ।
ती कुठे जन्मली याची ठेवणार आहे जाण ती ।
तीने काय करायचंय याचं इमान ठेवणार आहे ती ।।३।।
— चंदाराणी कोंडाळकर
Leave a Reply