गणपतीबाप्पा मोरया चांगली सत्बुद्धी देत रहा ॐ
काय मागावे आपण बाप्पाकडे वाटतच आहे रोज अनंत हस्ताने सत्य प्रेम व आनंद सगळीकडे मागतांना संपत नाहीत लिष्ट आमचीवाढत आहे शेपूटच त्याचीगणपतीबाप्पा मोरया चांगली सत्बुद्धी देत रहा ॐ
आता तरी आंम्हाला शहाणे करमागून मागून मागणार काय? तरक्षणभंगूर भौतिक संपत्ती, मान, सन्मानकितीही मिळाले तरी होत नाही मनाचे समाधानगणपतीबाप्पा मोरया चांगली सत्बुद्धी देत रहा ॐ
खितपत पडतो आम्हीं या संसारातशेवटच्या क्षणी आठवते राहून गेले मागता मागताखुपच जड झाली आहे माझी झोळी जिर्ण फाटकी भोकं पडलेली गणपतीबाप्पा मोरया चांगली सत्बुद्धी देत रहा ॐ
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply