काव्य रचनेचा छंद लागूनी, कविता करू लागलो
भाव तरंगाना आकार देवूनी, शब्दांत गुंफू लागलो….१,
एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो
वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो…२,
अचानकपणे खंत वाटूनी, निराश मी झालो
निरर्थक तो वेळ दवडिला, हेच मनी समजलो….३,
बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल
वेडेपणा वा शहाणपणा, काळ हाच ठरवील…४,
करूनी घेतले तुज कडूनी, कोणत्या तरी शक्तीने
कर्तेपणाचा भाव तुझ्यातील, सोडून दे तू मनाने….५,
असेल हे जर कृत्य त्याचे, काळजी त्याला यशाची
सैनिक तू लढत रहावे, आशा सोडून जिंकण्याची….६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply