अगदी ढोबळ मानाने पाहिले तर व्यंगचित्रा ( cartoon ) मध्ये एखाद्या व्यक्तीमधील न्यून अधिक प्रकर्षाने दाखविले जाते तर व्यक्तिचित्रा ( portrait ) मध्ये चांगल्या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या जातात आणि एखादे न्यून असलेच तरी ते दुय्यम ठरते. तर अर्कचित्रात ( caricature ) मुख्य वैशिष्ठ्ये अधोरेखित केली जातात.
मराठीतील काही कवींच्या कवितांची अर्कचित्रे काढण्याचा हा प्रयत्न आहे. या कविता मी त्या त्या कवीच्या शक्य तितक्या वैशिष्ठ्यांसह, त्या त्यांच्याच आहेत असे वाटावे अशा पद्धतीने रचल्या आहेत. या सर्व अत्यंत थोर कवींची क्षमा मागून हा प्रयत्न आपल्यापुढे मांडतो आहे.आपल्याला हा माझा प्रयत्न आवडेल अशी अशा आहे.
दरवर्षी ते लिज्जत पापडवाल्यांना पावसावर एक छान कविता लिहून देत असत. पाऊसही असा रसिक की तो ही कविता त्यांच्या सहीनिशी प्रसिद्ध झाल्याशिवाय नीटपणे पडतच नसे . आता पाडगावकरच नाहीत. म्हणून त्यांची क्षमा मागून तशा प्रकारची एक कविता करण्याचा
मी प्रयत्न केलाय. बघू या,पावसाला आवडते का ? सोबत ही कविता देत आहे.
” पाऊस आला, पाऊस आला ” …..
तसेच अत्यंत सुंदर चालीत बांधता येतील अशी शेकडो गीते रचणाऱ्या पाडगावकरांची बोलगाणी म्हणजे एक आगळेच सौंदर्यलेणे !
शब्दांची शिस्त,व्याकरणाचे नियम वगैरेंच्या भानगडीत न पडता एका वेगळ्याच मुक्त वळणाने विषय थेट मांडण्याची ही एक शब्दधमाल.
पावसावरील त्याच प्रकाराने मी लिहिलेले हे एक बोलगाणे !
“रेन म्हणजे, रेन म्हणजे, रेस असतो….
Leave a Reply