हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट विनोद वीरांमध्ये केश्टो मुखर्जी यांचे नाव येते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९०५ रोजी झाला.बहुतेक चित्रपटांमध्ये केश्टो मुखर्जी यांनी मद्यपीची भूमिका साकारली होती, परंतु आपल्या जीवनात त्यांना कसलेही व्यसन नव्हते. केश्टो मुखर्जी व ऋत्विक घटक यांची मैत्री होती.
ऋत्विक घटक यांच्या अनेक लहान, पण महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. केश्टो मुखर्जी यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘मुसाफिर’या चित्रपटात भूमिका केली होती, यात मुख्य भूमिका होत्या दिलीप कुमार आणि सुचित्रा सेन यांच्या आणि या चित्रपटाने हिंदी चित्रपटात केश्टो मुखर्जी यांना ब्रेक दिला होता.
केश्टो मुखर्जी यांनी अनेक चित्रपटात मद्यपी म्हणून काम केले असले तरी ते बासु चटर्जी यांच्या ‘खट्टा मीठा’ मधील शिक्षक भूमिका किंवा ‘अजरिक’ मध्ये वेड्याची किंवा ‘नागरिक’ मध्ये चरित्र भूमिकेत दिसले होते. जंजीर मध्येही केश्टो मुखर्जी यांनी वाईट व्यक्तिरेखा साकारली होती. केश्टो मुखर्जी यांनी बंगाली दिग्दर्शकांबरोबर सर्वाधिक हिंदी चित्रपट केले, ज्यात हृषिकेश मुखर्जी, शक्ती सामंता आणि बासु चटर्जी यांचा समावेश आहे.
बॉलिवूड मध्ये केश्टो मुखर्जी यांनी ९९ हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. केश्टो मुखर्जी यांचे काही चित्रपट ‘आपकी कसम’,‘खट्टा मीठा’, ‘जंजीर’ ‘माँ और ममता’ आणि ‘शोले’. केश्टो मुखर्जी यांचे २ मार्च १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply