नवीन लेखन...

खारी आंबील

ग्रामीण भागामध्ये आषाढ महिन्यामध्ये म्हसोबाच्या मांसाहारी जत्रा चालू होतात. तर दुसरीकडे तीन वर्षातून एकदा ताई आईची यात्रा सुद्धा आषाढ महिन्यात होत असते. एकीकडे मुके चार पायाचे जनावर देवाच्या पुढे कापायचे. म्हणजे भाऊ किती लोकांना त्रास होत नाही अंगाला फोड्या येत नाहीत किंवा काळे भोंगे उठत नाहीत. अशी एक अफवा पारंपारिक पद्धतीने ऐकावयास मिळते अर्थात या मुक्या जनावरांपासून देवाला काय मिळते व मानवाला काय मिळते. हे मला माहित नाही देव हा भक्तीचा भुकेला आहे तर माणूस पोटासाठी भुकेला आहे असे जाणवते. अशा पद्धतीच्या यात्रा कोकण भागामध्ये सुद्धा चालू असतात या भागची माणसे सुद्धा कोकणामध्ये पोहोचली आहेत. तिथे जाऊन एखाद्याला करणी करणे एखाद्याला देव घालणे असा प्रकार तर दुसरीकडे पाच वर्षातून निवडणूक लढवणारे उमेदवार सुद्धा. कोकणातील देवाचा आधार घेऊन निवडून येतात हे सुद्धा समजले आहे. स्वार्थासाठी सत्तेसाठी व प्रतिष्ठेसाठी झटणारी ही उमेदवार मंडळी. अशा बऱ्याच भानगडी परवा कोकण मधल्या देवरे शहाणे मला ऐकवल्या. मी परवा माझ्या मित्रासोबत निसर्ग पाहण्यासाठी गेलो होतो तिथे सारा हा प्रकार मला ऐकावयास मिळाला…।

… आणि मन म्हणू लागले प्रत्येक पाच वर्षातून ते तेच उमेदवार कसे निवडून येतात याचा मी विचार करू लागलो. लायकी नसणारे उमेदवार अशा भानगडी करून निवडून येतात हे परवा परवा समजले. मतदानासाठी गेलेला पैसा कसा वसूल करायचा हे पाच वर्षाचे गणित अगोदरच आखून ठेवलेले असते. मी समाजाचा सामाजिक कार्यकर्ता आहे हे फक्त म्हणायचे असते हजार कामापैकी 500 कामे करायची ती कुणाची. आपल्याला कोण मत देते त्याची नेहमीसारखा गरीब हा भरडला जातच असतो. महात्मा गांधीजींच्या वेळचे सरकार गेले आता नुसता तमाशा चालू आहे रोज एक राजकारणाचा नवीन वग. स्वार्थाला हपलेली ही नुसती खुर्चीसाठी भांडणे आहेत राजकारण म्हणजे दरोडेखोरांचा शेवटचा स्टाफ. पूर्वीची यशवंतराव चव्हाण यांच्यासारखी निरीक्षेप राजकारण करणारी माणसे आता निघून गेली. सध्याच्या मंत्र्याच्या नावावर किती भाग भांडवल आहे हे टीव्हीच्या माध्यमातून समजले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावावरती बँक बॅलन्स फक्त 14 रुपये होता सध्या कोणाच्या नावावर किती आहे हे स्पष्ट झाले आहे…।

… सध्याचे कार्यकर्ते दोन नंबरचे आहेत असे समजते काहीतरी भानगडी करून आपण निवडून यायचे. ही त्यांची फार मोठी मनामध्ये अभिलाषा असते असेच गढूळ राजकारण ग्रामीण भागामध्ये सुद्धा चालू आहे. कमी पैशांमध्ये जमीनी कशा लाटायच्या ही कला काहींना अवगत झाली आहे. त्यांचे मन म्हणत असावे वर गडूळ राजकारण आहे मग आपण का गप्प बसायचं. या खारी आंबील या कथेमुळे सर्वांचे रूप सर्वांनाच कळून आले आहे मंडळी ही खरी आंबील म्हणजे नक्की काय. असा काही ना प्रश्न पडला असेल कोकुटनोर किंवा सौंदती या गावांमध्ये. रेणुका देवीचे वास्तव आहे हे महाराष्ट्राला व महाराष्ट्रातील आम जनतेला पूर्णपणे माहित आहे. या देवीच्या नावावर चुकीचाफाफट पसारा सांगून ग्रामीण भागातील गोरगरिबांना लुटत आहेत. सहज जर कुणी या देवीला गेले तर देवीला स्वतःच्या घरामध्ये स्थापना केली पाहिजे असे सांगितले जाते. तर देवीला जाणारे काही भक्त देव देव करून आल्यानंतर प्रेमाने प्रसाद देतात आणि काही माणसे मनात मळ नसल्यामुळे तो प्रसाद खातात. काही दिवसांनी प्रसाद खाणाऱ्या माणसाला निसर्गाच्या नियमाप्रमाणे ताप थंड आली तर. ग्रामीण भागातील माणसे डॉक्टरकडे न जाता देव बघणाऱ्या लोकांचा आधार घेतात….।

….,,, काय करायचं काकू पोराचा ताप उतरत नाही,, काकू असे म्हणतात अंगात आलेली काकू म्हणते,, अरे बाळ का तुझा ताप कसा उतरेल तू फार मोठी चुकी केली आहेस..।

,,, आई कसली चुकी काकू म्हणते,,,।

,,, अगं मी तुझ्याकडे प्रसादातून आली आहे तुझ्या लक्षात कसे येत नाही. अंगात येणारी काकू म्हणते..।

,,, आई तू काय म्हणते आहेस ते मला मान्य आहे पण पोराचा ताप उतरू दे व माझा पोरगा खाड्या घोड्यासारखा कर. बाकी मला काही नको चुकून तुझ्याच सुनेने आमच्या घरात प्रसाद दिला आमच्या मनामध्ये काही मळ नव्हता. रेणुका आई ही जगाची आई आहे पण आई प्रसादातून आली आहे त्याच्यासाठी काय करावे लागेल काकू म्हणाली….।

,,, हे माझे सोने घे आणि पोराच्या अंगाला चोळ तुझ्या पोराचा ताप सकाळ पर्यंत निवळील. पण एक काम करावे लागेल अंगात आलेली काकू म्हणाली…।

,,, काय आई तू सांगशील ते मी कराय तयार आहे काकू म्हणाली…।

,,, अग तुझ्या देवाऱ्यावर मला यायची इच्छा झाली आहे तुझ्या घराचं मी भलं करणार आहे. पण माझी स्थापना सुती सवंडके व जोगती घेऊन स्थापना कर तुझा संसार सोन्यासारखा होईल. हे हातातली सोने सोन्यासारखे आहे तुला तुझ्या संसारात काही कमी पडणार नाही. अगं मी रेणुका ओल्या झाडाला आग लावणारी मी आहे आणि आग विझवणारी सुद्धा मीच आहे अंगात आलेली काकू म्हणाली….।

,,, होय आई हे मला समदं माहित आहे तुझी यायची इच्छा माझ्या घरी झाली आहे. मी तुला आनंदाने घरी घ्यायला तयार आहे काकू म्हणाली…।

,,, ठीक आहे बाळ का तू काळजी करू नको पण देवाला नाराज करू नको किती बी पैसा खर्च होऊ दे. त्याच्या दुप्पट तुला तुझ्या संसारात देईन हा कारडीचा शब्द आहे माझा यातील एक शब्द सुद्धा नाही. अरे बाळ का? मी नराच्या नारी केल्या आहेत मला जर कोणी नावे ठेवील. किंवा माझ्या लिंब काढणाऱ्या भक्ताला कोणी हसली तर. मी त्याचे तोंड वाकडे करते किंवा हाता पायाला महारोग भरविते. इतका मला राग आहे माझी भक्ती करणारे भक्त जन ही माझी मुलं व मुली आहेत माझा राग इतर दैवतापेक्षा फार रागीट आहे अंगात आलेली काकू म्हणाली…..।

… आता इतकी भीती दाखवल्या म्हटलं तर ग्रामीण भागातील बायका का मनामध्येभिणार नाहीत. डोंगराची आई पुरुषाच्या नारी करते हसले तर तोंड वाकडं करते. म्हणून या देवीला शक्यतो कोणी नावे ठेवत नाही असे मी ऐकून होतो. अंगात येणाऱ्या काकूच्या खरंच देवी येते का? हे ग्रामीण भागामध्ये कुणीही चाचपणी करत नाही म्हणूनच प्रत्येक घराघरात असे फोटो दिसून येतात. विश्वास ठेवण्यासारखी साधी भिती दाखवली तर ग्रामीण भागातील अशिक्षित मंडळी मनामध्ये भयंकर भीत असते. आणि भयानक खर्च करून देवीची स्थापना केली जाते हे निदर्शनास आले. एकीकडे देवाला काही लागत नाही दोन हात तिसरी मस्तक पुष्कळ आहे मग हा अनाटाई खर्च कशासाठी हा प्रश्न निर्माण होतो. या देवीची स्थापना केल्यानंतर काही दिवसांनी संसारामध्ये अडचण निर्माण झाली तर. ही मंडळी परत काकूकडे जाते आणि काकू सांगते…।

,,, मी तुझ्या घरात बसल्यापासून तुझे चांगले केले पण बाळ का तू एक चुकलीस..।

,, काय आई काकू म्हणते..।

,, माझी खरी भक्तीन मातंगी आई या आईने तुझी काही कामे केली. आणि तू तिला उपाशी ठेवलेस म्हणून मातंगी आई फार रागाला आली आहे. तिथे तू समाधान कर म्हणजे तुझ्या संसाराचा गाडा चांगला चालेल काकू म्हणते..।

,,, आई काय करायला पाहिजे काकू म्हणते..।

,,, मातंगी आई माझी प्रिय भक्तीन आहे अगंती मातंग समाजातील आहे. तिला खायला खारी आंबील लागते तिच्यासाठी तुला खारी आंबील करावी लागेल काकू म्हणते…।

,,, म्हणजे मी नक्की काय कराय हवे काकू म्हणते..।

,,, तू बोकड कापावयास हवे आणि गावातील लोक बोल ऊन त्याला मटन मटणाचा रस्सा कांदा लिंबू व भात याचे जेवण. तुझ्या दारात घालायला हवे मग बघ तुझा संसार कसा फुलतो काकू म्हणते..।

.. काकूच्या सांगण्यावरून ग्रामीण भागात सर्व घडत होते खारी आंबील हा कार्यक्रम होत होता. या कार्यक्रमाला मी सुद्धा जेवाय गेलो होतो माणसांच्या बोलण्यातून हे मी ऐकत होतो. मंडळी काकू ने सांगितल्याप्रमाणे या काकूंन देवीचे सर्व कार्यक्रम केले. निष्पाप मुका बोकड कापला गेला त्याचे मटन म्हणून खारी आंबील मातंगी मातेला दिली. नक्की किती पुण्य मिळाले याचा विचार मी मनात करत होतो. खरा देव कोणता याची चाचणी करणे आणि निर्णय घेणे हा विषय योग्य वाटतो. माणसाची नक्की सुख कुठे व कशात आहे हे ग्रामीण भागातील लोकांना माहीत नाही. कारण ही मंडळी निराक्षर आहे याचा फायदा देव अंगात घेऊन काहीतरी सांगणे हे कितपत खरे आहे. तरीपण अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये समाज भरडला जात आहे. याच्यासारखी कोणती खंत मोठी असू शकते देव मुका आहे तो कोणाशी बोलत नाही मग काकूच्या अंगात कसा येतो. हा विचार ग्रामीण भागातील मंडळी का करत नाही खारी आंबील मातंगी मातेला दिली ही आंबील मातीला पोचली का. हा विचार ग्रामीण भागातील समाज का करत नाही म्हणजे कोणतीही देवी असो ही शाकाहारी आहे असे अध्यात्म सांगते. मग कापाकापीच्या भानगडी ह्या कशासाठी स्वतःच्या पोटासाठी का जीबेचे चोचले पुरवण्यासाठी. कापाकापी हा विषय बंद झाला पाहिजे देव किंवा देवी शाकाहारी आहे ती मांसाहारी नाही. काकू सांगते म्हणून भरपूर पैसा खर्च करण्यात काय आनंद मिळणार आहे. हे इतके करून सुख मिळत असेल तर नक्की देव कोणता हा विचार करणे आवश्यक आहे. निष्पाप चार पाय मुके जनावराचा जीव घेऊन ही मंडळी काय साधते हा विचार अतिशय महत्वाचा आहे…।

…….. पूर्णविराम…।

-दत्तात्रय मानुगडे

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..