घडेल मनीचे,असेच वाटले होते
ते तर कधीच, काही घडले नाही
सरला, जरी भयाण काळोख
तरी, सभोवार उजाडलेच नाही
उरी,कृतार्थतेची आंस निर्मळी
परी, कृपावंत गवसलाच नाही
झाल्या घायाळ साऱ्या भावनां
अर्थ जीवनाचा कळलाच नाही
भासले होते सारेच सारे आपुले
व्यर्थ सारे, ही खंत सरली नाही
सत्य! कलियुगाचे हेची शाश्वत
मानवताच, जगती रुजली नाही
राम कृष्णही इथेची होवूनी गेले
महाभारत, आजही संपले नाही
सांध्यपर्वात! जाहलो आत्ममुख
तरी ही जगरहाटी कळलीच नाही
मनीचेच घडेल, असे वाटले होते
ते तर कधीच, काही घडले नाही
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १४८.
११ – १२ – २०२१.
Leave a Reply