निसर्गाचा अप्रतिम ठेवा, नदीकाठच्या पर्वत शिखरीं ।
बाह्य जगाचे वातावरण, धुंदी आणिते मनास भारी ।।१।।
त्याच वनी एकटे असतां, परि न लाभे एकांत तुम्हांला ।
चित्तामध्यें वादळ उठतां, महत्त्व नव्हते बाह्यांगाला ।।२।।
खडखडाट सारा होता, दैनंदिनीच्या नित्य जीवनी ।
समाधानी जर तुम्हीं असतां, शांतता दिसते त्याच मनीं ।।३।।
एकांततेची खरी कल्पना, मनावरती अवलंबूनी ।
अंतर्मन शांत असतां, बाह्य एकांत बघेना कुणी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply