बाराव्या शतकात फ्रान्समध्ये फिलीप गस्ट नावाचा राजा होऊन गेला. तो स्वतः अत्यंत पराक्रमी होता मात्र इतर पराक्रमी सैनिकांना वा सरदारांनाही तो सतत प्रोत्साहन द्यायचा. मुख्य म्हणजे त्याला सत्तेची कसलीच हाव नव्हती. आपल्या पदावर आपल्यासारखाच पराक्रमी व धाडसी राजा – मग तो कोणीही का असेना – बसावा, हीच त्याची इच्छा होती. त्या काळी देशाचे साम्राज्य वाढविण्यासाठी बऱ्याच लढाया होत. अशाच एका शत्रूराष्ट्राने कान्सवर हक्क चढविला. शत्रू बलाढ्य होता. त्यामुळे लढाईला तोंड फुटण्यापूर्वी राजा फिलीपने आपला राजमुकुट व पवित्र सिंहासन एका मैदानात आणण्याची सैनिकांना आज्ञा केली. सिंहासनावर त्याने राजमुकुट ठेवला व त्याखाली ‘सर्वोत्कृष्ट पराक्रम गाजविणाऱ्या वीर पुरुषास’ असा मजकूर असलेला फलक लिहून ठेवला व तेथे जमलेल्या सरदार व सैनिकांसमोर भाषण करताना तो म्हणाला, ” या सिंहासनावरील माझा हक्क मी या क्षणी सोडला आहे. या युद्धातके खय पराध्य करून विजयश्री खेचून आणील त्यालाच हे सिंहासन मिळेलच कोच यापुढचा राजा असेल.” त्याचे ते वीरश्रीयुक्त भाषण ऐकून सैनिकांना चेव चढला व अत्यंत शर्थीने ते लढले. अशा सैनिकांच्या सहकार्यानेच स्वत: राजा फिलीपनेही या युद्धात अतिशय मोठा पराक्रम केला व शत्रूराष्ट्रावर विजय मिळविला. सायंकाळी जेव्हा त्याच मैदानात सर्व एकत्र जमले, त्या वेळी सर्व सरदार व सैनिकांनी एकमुखाने त्याच्या पराक्रमाची प्रशंसा केली व राजा फिलीपचा जयजयकार करून त्यालाच ते सिंहासन पुन्हा बहाल केले.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply