मला एकदातरी मंत्री करा हो
खरच सांगते
आश्वासनांच टॉनिक पाजून
प्रजा सारी निरोगी करते
मला एकदा तरी शिक्षणमंत्री करा हो
एक एक अकरा म्हणून गणित साऱ्यांचं पक्क करते.
मला एकदा अर्थमंत्री करा हो
खरच सांगते
कर्जाचा डोंगर उभा करून
पुढील येणाऱ्या सरकारला फेडायला सांगते
मला एकदा गृहमंत्री कराच हो
खरं सांगते घरगुती भांडण चव्हाट्यावर मांडून
केलेली युती मोडीत काढते
मला एकदा संरक्षण मंत्री करा हो
खरं सांगते
देशाचं संरक्षण खातं तुमच्याच हातात देते
मला एकदा प्रधान मंत्री तर करून पाहा हो
खरं सांगते
साऱ्या मित्र राष्ट्रांनी शत्रू गोटात सामिल करते
विश्वास ठेवा
या दुनियेत जे कधी घडलच नाही,
ते सारं मी मंत्री झाल्यावरच अवश्य करते
— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply