मला नाही मान
मला नाही अपमान,
हेच तूं जाण
तत्व जीवनाचे….१
कुणी नाही सबळ
कुणी नसे दुर्बल
हा मनाचा खेळ
तुमच्या असे….२
कुणी नाही मोठा
कुणी नसे छोटा
प्रभूच्या ह्या वाटा
सारख्याच असती….३
विविधता दिसे
ती कृत्रिम असे
निसर्गाची नसे
ती वस्तूस्थिती….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply