मामा आला मामा आला
पिंटू टाळ्या पिटू लागला
काम टाकुन आई आली
इकडे तिकडे बघु लागली
पडद्यामागून उडी मारुन
उंदीर मामा पळुन गेला
आईने पिंट्याला सपाटा मारला
कारण त्याचे कळेना त्याला
वास आला भाजी करपली
आई झटकन आत गेली
पिंटू कोपर्यात रडत बसला
तोच मामा दारी आला
रडका पिंटू हसू लागला
लाटणे उगारत आई आली
भावाला पाहुन खुश झाली
आईने पिंटूचा पापा घेतला
रागाचे कारण लक्षात आले
मामाने खाऊचे पुडके दिले
उंदिरमामा डोकावला
पिंटूने त्याला हाकलून दिले.
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply