मंडळी परवा मी सहजच फिरायला गेलो होतो. सकाळी सकाळी माझ्यापुढे दोन बैल एक मालक अशी गाडी दिसली. माझ्या मनाला फार आनंद झाला आणि बैल पोळा या सणा ची आठवण झाली.
वर्षभर मालकासोबत अवता ला राबणारा बैल मला रोडवर दिसला याचा आनंद मला फार झाला. बैला सोबत छोटी गाडी दिसली व मी मनात विचार करू लागलो आणि बैल पोळा या सणाचे दिवस मला आठवू लागले.
मंडळी मी रानात राहिला असताना माझे मामा भगवान दादू कोकाटे हे आमच्या रानात यायचे व सोपान कुंभाराने दिलेली मातीची टोकदार शिंगे यांना माझे मामा रंग द्यायचे. मामा आले म्हणून मला फार आनंद होत असे. जुळेवाडी गावातून माझे मामा ऐन पावसाळ्यात छत्री घेऊन यायचे. आणि रानातील सप रा ला व माझ्या आनंदाला एक प्रकारचे उधान यायचं मामा आले की माझ्या मनाला एक प्रकारचा धीर यायचा. माझ्या मामाच लक्ष दोन बहिणी वर फार होत. गावात माझ्या दोन बहिणी अण्णांनी दिल्या आहेत त्यांचा संसार कसा चालला आहे याचे निरीक्षण माझे मामा करीत होते. माझ्या मामाला ज्वारीच्या पिठाचा झुणका फार आवडत होता म्हणून माझी आई ज्वारीच्या पिठाचा झुणका मामासाठी करीत होती. माझा मामा पांडुरंग कोकाटे भगवान कोकाटे यांनी पडत्या काळात पुष्कळ मदत केली हे मला आठवतं. माझ्या थोरल्या मामाने जोतिबाला नवस केले होते मला आणखी एक भाऊ होउदे. त्याच्या वज ना बरोबर खोबरे व गुला ल तराजूत घालून त्याच्या वजना चे खोबरे मी यात्रेकरूंना वाटे न ही माझ्या थोरल्या मामा ची करून कहानी ज्योतीबांनी ऐकली आणि माझा दुसरा मामा भगवान कोकाटे जलमाला आले. माझे मामा पांडुरंग दादू कोकाटे व भगवान दादू कोकाटे ही दोन माणसं जन्माला आली म्हणूनच या दोघांनी आम्हाला साथ केली. मंडळी माझे थोरले मामा यांची बायको गंगुबाई दुसऱ्या मामाची बायको अनुसया यांनी आम्हाला पडत्या काळात पुष्कळ मदत केली. म्हणूनच मी उभा आहे एवढे मात्र निश्चित संपूर्ण कोकाटे घराणे दयाळू आहे कोकाटे घराण्याला सद्गुरूंचा पूर्ण आशीर्वाद आहे मंडळी एवढ मात्र निश्चित.
-दत्तात्रय पांडुरंग मानुगडे.
Leave a Reply