किती रे खोड्या करिशी कृष्णा
यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।।
झोपू दे रे तिजला आतां, ती तर गेली खूप दमूनी
दही दुधांनी भांडी भरली,
काही प्याली, काही वाटली,
काही तर ती उपडी झाली,
पिऊनी सांडूनीच सगळे, नासलेस दही दूध लोणी…१,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी
गणरायाचे पूजन करितां
मग्न झाली यशोदा माता
लक्ष्य तुझे नैवेद्यीं पडतां
फस्त करशी कांहीं मोदक, ताटामधले तूंच खाऊनी….२,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
गोपींच्या तूं फोडल्या घागरी,
पळवी त्यांची वस्त्रे सारी,
दुधा तुपाची केली चोरी,
मौज वाटते गोप-गोपींना, नटखटता तुझी बघूनी…४
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
खोंड्या नच लीला बघूनी,
प्रेमभावना उचंबळूनी
जाई यशोदा ती बावरूनी
डोळ्यामधले लपवून आश्रू, लटका राग दिसे शब्दानी…५,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply