जगता जगता किती, कसा मी जगलो
सुखदुःख संवेदनांना झेलीत मी जगलो
आभाळ आठवांचे, कासाविस लोचनी
सावरीत सावरीत सांगू कसा मी जगलो
गीतात हितगुज, निःशब्द मनभावनांचे
आळवीत अलवार, सांगू कसा जगलो
अस्पष्ट झाल्या जरी खुणा गतस्मृतींच्या
क्षणक्षण, तुला शोधीत शोधीत जगलो
जीवन! दान प्रारब्धी त्या अनामीकाचे
बाहू पसरूनी, मी मौनात मुक्त जगलो
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १२१
२० – ९ – २०२१.
Leave a Reply