नवीन लेखन...

खुणावणाऱ्या “रचना”

युगानुयुगांपूर्वी (आता असंच म्हणायला हवं- १४ महिने चित्रपटगृहातील पडदा आणि नाटकाचा रंगमंच पाहिला नाही) पुण्याच्या बालगंधर्वला ” बाबला अँड हिज ऑर्केस्ट्रा “ला गेलो होतो दोन कारणांसाठी – ” कालीचरण ” ची टायटल ट्यून देणारा बाबला आणि “धर्मात्मा” साठी गायलेली कंचन या जोडीला ऐकण्यासाठी ! अपेक्षेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात कालीचरण ट्यूनने झाली. नंतर थोड्या वेळाने बोलबाला करीत पार्श्वगायिका कंचन यांना बोलाविण्यात आले. त्यांनी स्वतःचीच दोन गाणी इमाने इतबारे गायली.
पण इतरांनी अजरामर केलेल्या तीन रचनांचे मला सतत आश्चर्य वाटत राहिले आहे. अजूनही भल्याभल्यांना त्या गाऊन बघण्याचा ( त्यांचं शिवधनुष्य उचलून बघण्याचा) मोह आवरत नाही.
१) जाने कहाँ गये वो दिन –  “मुकेशच्या ” खूप आवृत्त्यांना हा प्रयत्न करायचा मोह आवरत नाही. खासगी मैफिलीत, ऑर्केस्ट्रात, स्वतःच्या तू-नळीवर अशा हौशी नवोदितांबरोबरच बुजुर्गांनाही हे गाणं खुणावतं. पण मुकेशच्या कोरड्या आवाजाला ( हातातून सारं निसटत गेलेल्या कलावंताच्या हाती/ ओठीच फक्त असा आर्त ऐकू येतो) सावरून घेणाऱ्या एसजे जोडीचे अश्रू ओघळणारे व्हायोलिन (आमच्या जोगांचे व्हायोलिन मात्र “गाणारे ” असायचे.)त्यांना टाळून जाते. प्रयत्न प्रामाणिक असतात पण ते दूरदेशीचे स्वर कंठातून येत नाही. समोर उत्तुंग शिखर दिसत असते पण चढताना दमछाक होते.
२) ए मेरे वतन के लोगो – सध्याच्या सगळ्या प्रसिद्ध-अप्रसिद्ध गायिकांनी याला हात लावून पाहिला पण त्यातील वेदना अद्याप त्यांच्या कंठातून उमटली नाही. तेथे सी रामचंद्र आणि लताच हवेत आणि देशभक्तीचा वाद्यवृंद !
३) रंजीस ही सही – वालचंदला असताना माझा मित्र सुधीर नेरुरकरने या मेहंदी हसन नामक माणसाची सवय लावली. आज तू-नळीवर जगजीत, शंकर महादेवन, तलत अझीझ, हरिहरन, सुरेश वाडकर यांची व्हर्शन्स आहेत. पण मेहंदी हसन अजून अस्पर्श. तेवढी तपस्या अजून इतरांच्या खात्यात जमा नाही.
( कोक स्टुडिओच्या वेडगळ प्रयत्नांना मी खिजगणतीतही धरत नाही.)
बाबला आणि कंचन त्यामानाने शहाणे -स्वतःच्या परिघाला ओलांडायचे त्यांनी टाळले.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..