नवीन लेखन...

किंकर्तव्यमूढम् !

|| हरि ॐ ||

<किंकर्तव्यमूढम्
मुंबईत सध्या अंधेरी ते बांद्रा रेल्वे स्टेशनच्या जवळील सर्व अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध मोहीम उघडून सर्व पादचारी (फुटपाथ) मार्ग नागरिकांना चालायला स्वच्छ व सुटसुटीत वाटत होते. परंतू काही कारणांनी त्यात व्यत्यय आला असून त्याची प्रगती खुंटली आहे. त्या मागील गुपित काय आहे

ते फक्त परमेश्वरच जाणे.

मुंबईत तरी रस्त्यातून चालताना फुटपाथ शोधणे हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. फेरीवाले व दुकानदारांचा असा समाज आहे की फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठी नसून आपल्यासाठीच बांधण्यात आले आहेत. सर्व भारतीय नागरीकांस व्यवसाय करण्याचा हक्क आहे पण रस्त्यावर व फुटपाथ व्यापून किंवा त्यावर बसून नाही कारण तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही. हे पर्यावरणालाहि घातक आहे कारण सर्व अनधिकृत फेरीवाले कचरा रस्त्यावरच फेकून देतात आणि त्यावर माश्या व इतर जीव जंतूंची निर्मिती होण्यास कारण होते.

पण इतर अनेक प्रकारच्या ठिय्या फेरीवाल्यांचे काय? कारण शासनाचे धोरण म्हणजे संबंधित अधिकार्‍यास चरण्यासाठी आणखीन एक कुरण. बर्‍याच प्रमाणात फेरीवाल्यांना उत्तेजन देण्यास एकापरीने आपण सर्वच जबाबदार आहोत. मुंबई आणि उपनगरांतील वाढत्या फेरीवाल्यांची कारणे पुढील प्रमाणे :-

१. आपल्यातील बरचसे नागरिक दैनदिन जीवनातील नित्यपयोगी वस्तू जसे भाजी, फळे, फुले, व इतर सामान मंडईतून विकत न घेता सवयी प्रमाणे रस्ता व फुटपाथवर बसलेल्या फेरीवाल्यांकडून विकत घेतांना दिसतात. का तर स्वस्तात व ते सुद्धा स्टेशनच्या बाहेर पडल्या पडल्या मिळतात म्हणून. मग ते उघड्यावरील धूळ व माश्या बसलेले तसेच त्याचा दर्जाहीन असले तरी चालते. मुंबईतील फेरीवाल्यांनी उत्तम सेल्समन होण्याच तंत्र आणि मंत्र लक्षात ठेवल आहे ते म्हणजे “कस्टमर इज ए किंग अॅन्ड किंग कॅन डू नो राँग” ( गिर्‍हाईक हा राजा आहे आणि राजा कधीही चूक करीत नाही) त्यांच्या मते ते आपल्याकडूनच माल विकत घेणार जातात कुठे? ते राजा सारखी चूक कधीच करणार नाहीत.

२. संबंधित अधिकार्‍यांनी नेहमीच बोटचेपी धोरण स्वीकारल्याने व जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने त्यांचा रस्ते व फुटपाथवर बसून व्यवसाय करण्याकडे कल वाढला.

३. देशातील अमर्याद लोकसंख्येचा व्यवसाय/नोकरीचा न सुटलेला प्रश्न वरील कारणास उद्युक्त करतो हे आपण रोजच अनुभवतो.

४. शासन, पोलीस व महापलिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कायद्याची व नियमांची कडक व भ्रष्टाचार विरहित अंमल बजावणी केली असती तर आज ही परिस्थिती उदभवलीच नसती असे नाईलाजाने म्हणावे लागत आहे.

एक दोन दिवस नुसता सामान उचलून जप्त करण्याचा देखावा महापालिका करते मग परत <“येरे माझ्या मागल्या”
<जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..