कीटक ते लहान असूनी
रहात होते फळामध्यें
विश्व तयाचे उंबर फळ
जीवन घालवी आनंदे १
ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती
उंबराच्या नसे पलिकडे
ज्यासी ते अथांग समजले
बघूनी त्या एका फळाकडे २
माहित नव्हते त्या कीटकाला
झाडावरची अगणित फळे
सृष्टीतील असंख्य झाडे
कशी मग ती त्यास कळे ३
आपण देखील रहात असतो
अशाच एका फळावरी
हीच फळे असंख्य असूनी
असंख्य झाडे विश्वावरी ४
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply