हे कंदमुळ सर्वांचेच फार आवडीचे व लाडके.प्रत्येक शाकाहारी पदार्थात घातल्यावर तो त्या पदार्थांची लज्जत अजुनच वाढवितो.बटाट्याचेकाप,भाजी,भजी,रस्साभाजी,आमटी,वेफर्स,चिवडा,समोसा,आणी मुंबई फेम बटाटेवडा,आलुपराठा,असे एक ना अनेक प्रकारे आपण ह्याचा फोडशा पाडत असतो.
बटाटा हा कंद देखील जमीनीखाली उगवतो.हा खरे पाहता जुनाच वापरावा तसेच हिरवा बटाटा हा विषवत असतो म्हणून तो कधीच खाऊ नये.तसेच डायबेटिस असणा-यांनी,वजन कमी करायचे असल्यास हा खाऊ नये.बटाट्याच्या सालीत जीवनसत्व क असते त्यामुळे बटाटा हा सालीसकटच उकडावा.
बटाटा हा चवीला गोड,थंड व कफवात वाढविणारा व पित्तनाशक असतो.चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:
१)बध्दकोष्ठाचा त्रास असल्यास शेगडीवर अथवा चुलीत बटाटा भाजावा व त्यावर सैंधव,काळेमीठ,जीरे,मिरी घालून खावा.
२)बटाटा भाजून जिरे,मिरी,सैंधव लावून खाल्ल्याने वारंवार होणारी सर्दी कमी होते.
३)लघ्वी कमी होणे,जळजळ होणे,पिवळी लघ्वी होणे ह्या बटाटा उकडून धणे,जीरे व सैंधव लावून खावा.
४)नवा बटाटा उकडून बाळंतीण बाईला दिल्यास अंगावरचे दुध वाढते.
बटाट अतिखाल्ल्यास वात विकार वाढतात व वजन वाढते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply